Homeताज्या बातम्यामहाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर, 2 डिसेंबरला मतदान, 3 डिसेंबरला मतमोजणी,...

महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर, 2 डिसेंबरला मतदान, 3 डिसेंबरला मतमोजणी, वाचा संपूर्ण कार्यक्रम

महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर, 2 डिसेंबरला मतदान, 3 डिसेंबरला मतमोजणी, वाचा संपूर्ण कार्यक्रम.

मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. राज्य निवडणूक आयोगाची आज अतिशय महत्त्वाची पत्रकार परिषद पार पडली. या पत्रकार परिषदेला राज्य निडणूक आयोगाचे आयुक्त दिनेश वाघमारे, सचिव सुरेश काकाने, उपसचिव सुर्यकृष्ण मूर्ती, उपायुक्त राजेंद्र पाटील उपस्थित होते. यावेळी आयुक्त दिनेश वाघमारे यांनी राज्यातील 246 नगर परिषदा आणि 42 नगर पंचायतींचा कार्यक्रम जाहीर केला. या सर्व नगर परिषदा आणि नगर पंचायतींसाठी येत्या 2 डिसेंबरला मतदान होणार आहे. त्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी 3 डिसेंबरला मतमोजनी होणार आहे.

निवडणुकीचा कार्यक्रम कसा असेल?

“नगर परिषद आणि नगर पंचायत यांचा प्रत्यक्ष कार्यक्रम जाहीर करत आहोत. नामनिर्देशन पत्र दाखल करण्याची सुरुवात ही 10 नोव्हेंबर 2025 पासून होईल. नामनिर्देशन पत्र दाखल करण्याची अंतिम मुदत ही 17 नोव्हेंबर 2025 असेल. नामनिर्देशन पत्राची 18 नोव्हेंबर 2025 ला छाननी होईल. अपील नसलेल्या ठिकाणी नामनिर्देशन पत्र माघारी घेण्याची मुदत ही 21 नोव्हेंबर 2025 असेल. अपील असलेल्या ठिकाणी नामनिर्देशन पत्र माघार घेण्याची अंतिम मुदत 25 नोव्हेंबर 2025 असेल”, अशी माहिती निवडणूक आयुक्तांनी दिली. “निवडणूक चिन्ह नेमून देण्याचा तसेच अंतिमरित्या निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची यादी ही 26 डिसेंबर 2025 ला जाहीर होईल. मतदानाचा दिवस हा 2 डिसेंबर 2025 असेल आणि मतमोजणीचा दिवस 3 डिसेंबर 2025 असेल. शासन राजपत्रात निकाल प्रसिद्ध करण्याचा दिवस हा 10 डिसेंबर 2025 असेल”, अशी महत्त्वाची माहिती निवडणूक आयुक्तांनी दिली.

निवडणूक आयुक्तांनी दिली महत्त्वाची माहिती

सर्वाच्च न्यायालयाने 31 जानेवारी 2026 पूर्वी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचे निर्देस दिले आहेत. त्या दृष्टीने आपल्याशी संवाद साधावा आणि आपल्या मार्फत हा संदेश पोहोचवण्यासाठी ही पत्रकार परिषद आयोजित केलेली आहे. ही पत्रकार परिषद फक्त नगर परिषद आणि नगर पंचायती संदर्भात आहे. राज्यातील पात्र असलेल्या 246 नगर परिषदा आणि 42 नगर पंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका घेण्यात येणार आहेत. यामध्ये एकूण 86859 सदस्य आणि 288 अध्यक्षांची निवड होणार आहे. 246 नगर परिषदांमध्ये 10 नवनिर्वाचित नगरपरिषदांचा समावेश आहे. 236 नगर परिषदांची मुदत यापूर्वीच संपलेली आहे.

निवडणूक आयुक्तांनी दिली महत्त्वाची माहिती

सर्वाच्च न्यायालयाने 31 जानेवारी 2026 पूर्वी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचे निर्देस दिले आहेत. त्या दृष्टीने आपल्याशी संवाद साधावा आणि आपल्या मार्फत हा संदेश पोहोचवण्यासाठी ही पत्रकार परिषद आयोजित केलेली आहे. ही पत्रकार परिषद फक्त नगर परिषद आणि नगर पंचायती संदर्भात आहे. राज्यातील पात्र असलेल्या 246 नगर परिषदा आणि 42 नगर पंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका घेण्यात येणार आहेत. यामध्ये एकूण 86859 सदस्य आणि 288 अध्यक्षांची निवड होणार आहे. 246 नगर परिषदांमध्ये 10 नवनिर्वाचित नगरपरिषदांचा समावेश आहे. 236 नगर परिषदांची मुदत यापूर्वीच संपलेली आहे. नगर परिषदांची सदस्य संख्या ही 20 ते 75 आहे आणि नगर पंचायतची सदस्य संख्या ही 17 आहे. नगर परिषदेची निवडणूक ही बहुसदस्य पद्धतीने आहे. साधारण एका प्रभागामध्ये दोन जागा नगर परिषदेमध्ये असतात. पण नगर परिषदेचा सदस्य संख्या विषम असेल तर एका प्रभागात तीन जागा असतात. साधारणत: मतदारांना दोन ते तीन सदस्यांसाठी मतदान करावं लागेल. याशिवाय नगर परिषदेचा एक अध्यक्ष राहील त्याच्यासाठी देखील मतदान करावं लागेल.

नगर पंचायतीमध्ये एक सदस्य आणि एक अध्यक्ष असतो. त्यामुळे तिथे मतदारांना 2 मते द्यावी लागतील.

नामनिर्देशन हे निवडणूक आयोगाने निर्माण केलेल्या संकेतस्थळावर स्वीकारले जातील. एका प्रभागाम्ये एका उमेदवाराला जास्तीत जास्त चार नामनिर्देशन पत्र दाखल करता येतील. यासोबत जात वैधता प्रमाणपत्र आवश्यकता आहे. ज्यांनी जात वैधता प्रमाणपत्रासाठी अर्ज केला आहे त्यांना अर्ज केल्याची पावती जमा करावी लागील. पण असा उमेदवार निवडून आला तर त्याला निवडून आल्यानंतर सहा महिन्यात जात वैधता प्रमाणपत्र देणं आवश्यक राहील.

नगर परिषद आणि नगर पंचायतींसाठी मतदार यादी प्रसिद्ध झाली आहे. मतदान केंद्र निहाय मतदान याद्या 7 नोव्हेंबरला जाहीर होणार आहे.

उमेदवारांसाठी खर्च मर्यादा वाढवण्यात आली आहे. अ वर्ग नगर परिषदेसाठी सदस्य पदासाठी 5 लाख आणि अध्यक्ष पदासाठी 15 लाख, ब वर्गासाठी अध्यक्ष पदासाठी 11 लाख 25 हजार आणि सदस्य पदासाठी 3 लाख 50 हजार, क वर्गासाठी अध्यक्ष पदासाठी 7 लाख 50 हजार आणि सदस्य पदासाठी 2 लाख 50 हजार. नगरपंचायतीसाठी अध्यक्ष पदासाठी 6 लाख आणि सदस्य पदासाठी 2 लाख 25 हजार अशी खर्चाची मर्यादा आहे.

मतदारांसाठी जे संकेतस्थळ विकसित केली आहे त्यामध्ये सर्च फॅसिलिटी दिली आहे. त्यामध्ये मतादारांना त्यांचं नाव आणि मतदान केंद्र शोधता येईल. मतदारांसाठी मोबाईल अॅप तयार केलं आहे. त्यामध्ये तुमच्या उमेदवारांविषयी आणि इतर सर्व माहिती मिळेल.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

दिव्यात नालेसफाईच्या कामात मोठ्या भ्रष्टाचाराचा आरोप; प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह

दिव्यात नालेसफाईच्या कामात मोठ्या भ्रष्टाचाराचा आरोप; प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह दिवा | प्रतिनिधी दिवा प्रभाग समिती अंतर्गत सुरू असलेल्या नालेसफाईच्या कामांमध्ये मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार होत असल्याचा गंभीर...

कल्याण वालधुनी बुद्धभूमी प्रकरणाने बौद्ध समाजात संतापाची लाट; अन्यायाविरोधात एकजुटीचे आवाहन ऑल इंडिया पँथर...

कल्याण वालधुनी बुद्धभूमी प्रकरणाने बौद्ध समाजात संतापाची लाट; अन्यायाविरोधात एकजुटीचे आवाहन ऑल इंडिया पँथर सेनेचे निवेदन  कल्याण : कल्याण येथील वालधुनी बुद्धभूमी परिसरात सुरू असलेल्या...

कोकण रेल्वे भरती प्रक्रियेवर महाराष्ट्रातून संताप १३२ जागांसाठी भरती; मुलाखती मात्र विशाखापट्टणम येथे...

कोकण रेल्वे भरती प्रक्रियेवर महाराष्ट्रातून संताप १३२ जागांसाठी भरती; मुलाखती मात्र विशाखापट्टणम येथे — स्थानिक तरुणांवर अन्यायाचा आरोप मुंबई | प्रतिनिधी कोकण रेल्वे महामंडळाच्या (KRCL) १३२ विविध...

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षात राहुल शिंदे यांचा जाहीर प्रवेश

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षात राहुल शिंदे यांचा जाहीर प्रवेश दिवा प्रतिनिधी : रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाचे दिवंगत लोकनेते एकनाथ भगत यांच्या समाजाभिमुख...

दिव्यातील नालेसफाईवर मनसे आक्रमक; प्रशासनाच्या दाव्यांवर उपस्थित केले गंभीर प्रश्न

दिव्यातील नालेसफाईवर मनसे आक्रमक; प्रशासनाच्या दाव्यांवर उपस्थित केले गंभीर प्रश्न दिवा | प्रतिनिधी पावसाळा तोंडावर असताना दिवा शहरातील नालेसफाईची कामे अत्यंत संथ गतीने सुरू असल्याचा आरोप...

error: Content is protected !!