Homeक्राईम५८ लाख रूपये किमंतीचा गुटखा जप्त

५८ लाख रूपये किमंतीचा गुटखा जप्त

“महाराष्ट्र शासनाने प्रतिबंध केलेला व मानवी जिवीतास हानीकारक असलेला सुंगधित सुपारी/तंबाखु (गुटखा) असा सुमारे ५८ लाख रूपये किमंतीचा मुद्देमालासह आरोपी जेरबंद”

महाराष्ट्र शासनाने प्रतिबंध केलेला व मानवी जिवीतास हानीकारक असलेला सुंगधित सुपारी / तंबाखु (गुटखा) यांचा साठा करणे व विक्री करण्यास प्रतिबंध केलेला आहे याअनुषंगाने ठाणे पोलीस आयुक्तालयामध्ये मा. पोलीस आयुक्त साो, ठाणे शहर यांनी प्रतिबंधीत सुंगधित सुपारी / तंबाखु (गुटखा) यांची विक्री अथवा साठा करणा-या विरूदध कठोर कारवाई करण्याचे आदेश दिलेले आहेत.

दिनांक ३०/१०/२०२५ रोजी पहाटे ०२:३० वाजता कासारवडवली वाहतुक उप विभाग येथील

नेमणुकीतील सपोउपनिरी/राजेंद्र भालेराव हे नागला बंदर, घोडबंदर रोड, ठाणे येथे कर्तव्य बजावित असताना आयशर टेम्पो क. डीडी/०१/एसी/९१६४ ही थांबवुन चेक केली असता, सदर वाहनामध्ये संशयित माल असल्याचे त्यांना दिसुन आल्याने प्राथमिक चौकशी करून कासारवडवली पोलीस ठाण्यास मदतीकरिता संपर्क केल्याने सपोनिरी/जोगदंड, पोउपनिरी/हांगे व अंमलदार असे घटनास्थळी गेले. तेथे आयशर टेम्पो चालक जगराज सिंग जसबीर सिंग खैरा रा. अमोल डेरीच्या समोर, टोकरेपाडा, विरार पूर्व यांच्याकडे चौकशी केली असता तो समाधानकारक उत्तर देत नसल्याने सदरचा टेम्पो मालासह पोलीस ठाण्यात आणला. टेम्पोमधील मालाची पाहणी केली असता त्या मध्ये १२० ते १३० नवीन कपडयाच्या गठयामधील काही गठयामधील सुगंधीत सुपारी/गुटखा सारखा वास येत असल्याने चालकास विश्वासात घेवुन अधिक विचारपुस केली असता त्याने नमुद कपडयाचा गठठयामधील काही गठठ्यामध्ये सुगंधीत सुपारी/गुटखा असल्याचे कबुल केले.

सदर टेम्पोमध्ये कपडयाच्या गठ्याच्या मध्ये सुधा प्लस, एसकेएन, नवी चेवींग इत्यादी कंपनीचा महाराष्ट्र शासनाने प्रतिबंध केलेला व मानवी जिवीतास हानीकारक असलेला सुंगधित सुपारी / तंबाखु (गुटखा) असा एकुण सुमारे १६,५५,६४०/- रूपये किंमतीचा, गुटखा लपवुन आणण्याकरिता वापरलेला सुमारे ११,०६,६१३/- रूपये किंमतीचा नवीन कपडा तसेच सदरचा गुटखा वाहतुकी करिता वापर केलेला ३०,५०,०००/- आयशर टेम्पो असा एकुण ५८,१२, २५३ किमतीचा मुददेमाल रितसर पंचनामा करून ताब्यात घेण्यात आलेला आहे.

सदर बाबत आरोपीविरूध्द कासारवडवली पोलीस स्टेशन गु.र.क्रं. । ९४६/२०२५ अन्न सुरक्षा व मानके अधिनियम २००६ चे कलम २६ (२) (१) (४), २७ (३), २७ (३) (डी) सह वचन कलम ३ शिक्षा कलम ५९(३), सह भा.न्या.सं. २०२३ चे कलम २२३, २७४, २७५, १२३, ३ (५) अन्वये दिनांक १९/१०/२०२५ रोजी प्रमाणे नोंद करण्यात आलेला असुन आरोपीस दिनांक ३१/१०/२०२५ रोजी अटक करण्यात आलेली असुन मा. न्यायालयाने दिनांक ०५/११/२०२५ रोजी पावेतो पोलीस कोठडी मंजुर केलेली आहे.

सदर आरोपीतांनी सुधा प्लस, एसकेएन, नवी चेवींग व इतर कंपनीचा महाराष्ट्र शासनाने प्रतिबंध केलेला व मानवी जिवीतास हानीकारक असलेला सुंगधित सुपारी / तंबाखु (गुटखा) बेकायदेशिररित्या पुरवठा करणारे तसेच सदर अवैध व्यवसायामध्ये सहभागी असणा-या इसमांना गुन्हयाच्या तपासात निष्पन्न करून चत्यांचा शोध घेवुन पुढील कारवाईच्या अनुषंगाने तपास सुरु आहे.

सदरची उल्लेखनिय कामगिरी श्री. प्रशांत कदम, पोलीस उप आयुक्त, परि-५, वागळे इस्टेट, ठाणे, श्री. मंदार जवळे, सहा. पोलीस आयुक्त, वर्तकनगर विभाग यांचे मार्गदर्शनाखाली कासारवडवली पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, श्री. निवृत्ती कोल्हटकर, सपोनिरी/जोगदंड, पोउपनिरी/हांगे, श्रेपोउपनिरी सुनिल सुर्यवंशी, सपोउपनिरी/काटकर, पोलीस अंमलदार गोरखनाथ काळे, जगदीश पवार, माळी व संदीप तुपे तसेच सपोउपनिरी/भालेराव नेमणुक शहर वाहतुक शाखा, ठाणे यांनी केलेली आहे. गुन्हयाच्या पुढील तपास पोउपनिरी/हांगे हे करीत आहे.
Thane Police Commissionerate #thane #thanecity #newsupdate2025 #trend #trendingpost #everyonefollowers #trendingshorts #explorepage #trendingpostchallenge #trendingreelsvideo #trendingvideos #live

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

दिव्यात नालेसफाईच्या कामात मोठ्या भ्रष्टाचाराचा आरोप; प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह

दिव्यात नालेसफाईच्या कामात मोठ्या भ्रष्टाचाराचा आरोप; प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह दिवा | प्रतिनिधी दिवा प्रभाग समिती अंतर्गत सुरू असलेल्या नालेसफाईच्या कामांमध्ये मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार होत असल्याचा गंभीर...

कल्याण वालधुनी बुद्धभूमी प्रकरणाने बौद्ध समाजात संतापाची लाट; अन्यायाविरोधात एकजुटीचे आवाहन ऑल इंडिया पँथर...

कल्याण वालधुनी बुद्धभूमी प्रकरणाने बौद्ध समाजात संतापाची लाट; अन्यायाविरोधात एकजुटीचे आवाहन ऑल इंडिया पँथर सेनेचे निवेदन  कल्याण : कल्याण येथील वालधुनी बुद्धभूमी परिसरात सुरू असलेल्या...

कोकण रेल्वे भरती प्रक्रियेवर महाराष्ट्रातून संताप १३२ जागांसाठी भरती; मुलाखती मात्र विशाखापट्टणम येथे...

कोकण रेल्वे भरती प्रक्रियेवर महाराष्ट्रातून संताप १३२ जागांसाठी भरती; मुलाखती मात्र विशाखापट्टणम येथे — स्थानिक तरुणांवर अन्यायाचा आरोप मुंबई | प्रतिनिधी कोकण रेल्वे महामंडळाच्या (KRCL) १३२ विविध...

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षात राहुल शिंदे यांचा जाहीर प्रवेश

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षात राहुल शिंदे यांचा जाहीर प्रवेश दिवा प्रतिनिधी : रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाचे दिवंगत लोकनेते एकनाथ भगत यांच्या समाजाभिमुख...

दिव्यातील नालेसफाईवर मनसे आक्रमक; प्रशासनाच्या दाव्यांवर उपस्थित केले गंभीर प्रश्न

दिव्यातील नालेसफाईवर मनसे आक्रमक; प्रशासनाच्या दाव्यांवर उपस्थित केले गंभीर प्रश्न दिवा | प्रतिनिधी पावसाळा तोंडावर असताना दिवा शहरातील नालेसफाईची कामे अत्यंत संथ गतीने सुरू असल्याचा आरोप...

error: Content is protected !!