⭕ब्रेकिंग : दिव्यातील मुंब्रादेवी कॉलनीत घरगुती गॅस लिकेज झाल्याने घर सामान जळाले.
दिवा. प्रतिनिधी अमोल जाधव
ठाणे, दिवा : आज दिनांक २५/१०/२०२५ रोजी सकाळी १०:०२ वाजताच्या सुमारास आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडे प्राप्त झालेल्या घटनेच्या माहितीनुसार (घटनेची माहिती देणारे :- शीळ अग्निशमन केंद्र) गणेश प्लाझा इमारत, मुंब्रा देवी कॉलनी, दिवा. या ठिकाणी गणेश प्लाझा इमारत (तळ+०६ मधली इमारत) या इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरील रूम क्रमांक:-३०४ (मालक:- श्री. राहुल पंडित) या रूम मधील भारत गॅस सिलेंडरचा नोझल लिकेज होऊन आग लागली होती. सदर घटनास्थळी टोरंट पॉवरचे कर्मचारी, भारत गॅस कंपनीचे कर्मचारी व अग्निशमन दलाचे जवान ०१-फायर वाहनासह, ०१-रेस्क्यू वाहनासह उपस्थित होते. सदर घटनास्थळी कोणालाही दुखापत नाही.
(सदर घटनास्थळी आग लागल्यामुळे घरातील ए.सी. युनिट, वॉशिंग मशीन, किचन मधील भांडी इतर साहित्य व इलेक्ट्रिक वायरिंग पूर्णपणे जळाले आहे.)
(सदर घटनास्थळी लिकेज असलेला गॅस सिलेंडर भारत गॅस कंपनीचे कर्मचारी यांच्या ताब्यात देण्यात आला आहे.)
सदर घटनास्थळी लागलेली आग स्थानिक रहिवासी व अग्निशमन दलाचे जवान यांच्या मदतीने पूर्णपणे विझविण्यात आली असून, परिस्थिती नियंत्रणात आहे.

मुख्य संपादक: संदीप जाधव





















