Homeक्राईमराहुल मकासरे यांच्यावरील FIR नंतर प्रकाश आंबेडकरांची तीव्र प्रतिक्रिया

राहुल मकासरे यांच्यावरील FIR नंतर प्रकाश आंबेडकरांची तीव्र प्रतिक्रिया

देश फुले, शाहू, आंबेडकरी विचारधारेने चालेल, मनुवादाने नाही!

राहुल मकासरे यांच्यावरील FIR नंतर प्रकाश आंबेडकरांची तीव्र प्रतिक्रिया

औरंगाबाद : वंचित बहुजन युवा आघाडीचे औरंगाबाद पश्चिम शहराध्यक्ष राहुल मकासरे यांनी काही दिवसांपूर्वी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (RSS) कार्यकर्त्यांना औरंगाबाद येथील पॉलिटेक्निक कॉलेजसमोर परवानगीशिवाय स्टॉल लावण्यापासून रोखले होते.

या घटनेनंतर RSS ने राहुल मकासरे यांच्याविरोधात FIR दाखल केली असून, राहुल यांच्यावर अजामीनपात्र गुन्ह्याखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या संपूर्ण प्रकरणावरून वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी आपल्या अधिकृत ‘एक्स’ (पूर्वीचे ट्विटर) हँडलवर ट्विट करत पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. राहुल मकासरे यांनी फक्त ‘तुमच्याकडे परवानगी आहे का?’ एवढाच प्रश्न विचारला होता आणि ते कोणत्याही हिंसाचारात सामील नव्हते, तरीही त्यांच्यावर अजामीनपात्र गुन्हा दाखल करण्यात आला, हे पोलिसांच्या ‘मनुवादी वृत्ती’चे द्योतक असल्याचे आंबेडकर यांनी म्हटले आहे.

आंबेडकर यांनी स्पष्ट केले आहे की, RSS ही वंचित बहुजन आघाडीच्या फुले, शाहू आणि आंबेडकरी विचारधारेला घाबरते. त्यांनी जाहीर केले आहे की, वंचित बहुजन आघाडी राहुल मकासरे यांच्यासोबत खंबीरपणे उभी आहे. तसेच, औरंगाबाद वंचित बहुजन आघाडी टीमला निर्देश देण्यात आले आहेत की, ज्या तपास अधिकाऱ्याने राहुल यांच्याविरोधात खोटी FIR दाखल केली आहे, त्याच्याविरोधात ॲट्रॉसिटी कायद्यांतर्गत (SC/ST Act) गुन्हा दाखल करावा.

आपला देश फुले, शाहू आणि आंबेडकरी विचारधारेने चालेल, मनुवादाने नाही! असे ठाम मत ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी आपल्या ट्विटच्या शेवटी मांडले आहे.

#Vanchitbahujanaghadi #Maharashtra #Aurangabad #justice #fir #prakashambedkar

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

दिव्यात नालेसफाईच्या कामात मोठ्या भ्रष्टाचाराचा आरोप; प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह

दिव्यात नालेसफाईच्या कामात मोठ्या भ्रष्टाचाराचा आरोप; प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह दिवा | प्रतिनिधी दिवा प्रभाग समिती अंतर्गत सुरू असलेल्या नालेसफाईच्या कामांमध्ये मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार होत असल्याचा गंभीर...

कल्याण वालधुनी बुद्धभूमी प्रकरणाने बौद्ध समाजात संतापाची लाट; अन्यायाविरोधात एकजुटीचे आवाहन ऑल इंडिया पँथर...

कल्याण वालधुनी बुद्धभूमी प्रकरणाने बौद्ध समाजात संतापाची लाट; अन्यायाविरोधात एकजुटीचे आवाहन ऑल इंडिया पँथर सेनेचे निवेदन  कल्याण : कल्याण येथील वालधुनी बुद्धभूमी परिसरात सुरू असलेल्या...

कोकण रेल्वे भरती प्रक्रियेवर महाराष्ट्रातून संताप १३२ जागांसाठी भरती; मुलाखती मात्र विशाखापट्टणम येथे...

कोकण रेल्वे भरती प्रक्रियेवर महाराष्ट्रातून संताप १३२ जागांसाठी भरती; मुलाखती मात्र विशाखापट्टणम येथे — स्थानिक तरुणांवर अन्यायाचा आरोप मुंबई | प्रतिनिधी कोकण रेल्वे महामंडळाच्या (KRCL) १३२ विविध...

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षात राहुल शिंदे यांचा जाहीर प्रवेश

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षात राहुल शिंदे यांचा जाहीर प्रवेश दिवा प्रतिनिधी : रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाचे दिवंगत लोकनेते एकनाथ भगत यांच्या समाजाभिमुख...

दिव्यातील नालेसफाईवर मनसे आक्रमक; प्रशासनाच्या दाव्यांवर उपस्थित केले गंभीर प्रश्न

दिव्यातील नालेसफाईवर मनसे आक्रमक; प्रशासनाच्या दाव्यांवर उपस्थित केले गंभीर प्रश्न दिवा | प्रतिनिधी पावसाळा तोंडावर असताना दिवा शहरातील नालेसफाईची कामे अत्यंत संथ गतीने सुरू असल्याचा आरोप...

error: Content is protected !!