Acp प्रिया डमाळे मुंब्रा सिनियर पोलीस अनिल शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली दिवा शहरांत जनजागृती मार्च काढण्यात आला
दिवा. प्रतिनिधी: अमोल जाधव.
त्यामद्दे नागरिकांच्या सुरक्षा आणि सतर्कतेचा संदेश देण्यात आला. दिवाळी सनानिमित्त रस्त्यावर लागणाऱ्या फटाक्यांच्या दुकानांमुळे वाहतूक कोंडी होऊ नये, वाहनांची पार्किंग,ऑनलाईन फ्रॉड, चोरीचे प्रकार याची सावधानगी बाळगणे,दिवाळी सुट्टीमेद्दे जास्त सोन घालून घराबाहेर पडू नका
दिवाळीनिमित्त गावी जायचं असल्यास घरातील मौल्यवान वस्तू सोबत घेऊन जा अथवा शेजार्यांना तुम्ही गावी जाताय याची कल्पना द्या. दिवाळी सनानिमित्त तुम्हाला सांगण्यात येईल कि फराळ वाटप, साड्या वाटप, किव्हा इतर अमिश दाखवून तुम्ही घराबाहेर पडण्यास तुम्हाला प्रवृत्त केले जाईल आणि त्यादरम्यान चोरी होऊ शकते फसवणूक होऊ शकते याची काळजी नागरिकांनी घ्यावी आणि प्रशासनाला जनतेने सहकार्य करण्याचे आव्हान करण्यात आले.
या जनजागृती मार्च मद्दे दिवा पोलीस api अमोल कोळेकर api अनु शर्मा aip सोनावणे. रवींद्र सातपुते उपस्थित होते

मुख्य संपादक: संदीप जाधव





















