Homeक्राईमपालघर पोलीस दलाकडून अवैधरित्या गुटख्याची वाहतुक करणाऱ्या आरोपीवर कारवाई करून एकूण १६,०६,१००/-...

पालघर पोलीस दलाकडून अवैधरित्या गुटख्याची वाहतुक करणाऱ्या आरोपीवर कारवाई करून एकूण १६,०६,१००/- रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त.

पालघर पोलीस दलाकडून अवैधरित्या गुटख्याची वाहतुक करणाऱ्या आरोपीवर कारवाई करून एकूण १६,०६,१००/- रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त.

आगामी गणेश उत्सवाच्या अनुषंगाने पोलीस अधीक्षक पालघर श्री. यतिश देशमुख यांनी पालघर जिल्हयातील अवैध धंदयावर कारवाया करण्याबाबत सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी व स्थानिक गुन्हे शाखा, पालघर यांना सक्त सुचना दिलेल्या आहेत.

दिनांक २८/०८/२०२५ रोजी स्थानिक गुन्हे शाखा, पालघरचे पोलीस पथक हे मुंबई-अहमदाबाद महामार्गावर अवैध धंद्यावर कारवाई करण्याचे अनुषंगाने पेट्रोलींग करीत असतांना गोपणीय बातमी मिळाली की, गुजरात बाजूकडून मुंबई बाजूकडे अवैधरित्या गुटख्याची वाहतूक होणार आहे. नमूद माहितीच्या आधारे तलासरी पोलीस ठाणे हद्दितील मुंबई-अहमदाबाद महामार्गावर हिमाचल पंजाब ढाब्याचे समोर संशयीत वाहने चेक करत असताना DD03R9277 या क्रमांकाचा आयसर टेम्पो येत असताना दिसून आला. सदर टेम्पो चालकास टेम्पो बाजूला घेण्यास सांगून त्यास व त्याचे दोन साथीदार यांना नाव पत्ता विचारले असता त्यांनी आपले नाव १) मोहम्मद अरबाज जमीरउल हक, वय २२ वर्षे, व्यवसाय-चालक, रा. नरसिंहगड, पो. मुआर आधारगंज बनवारपुरा, जि. प्रतापगड उत्तरप्रदेश, २) दिलशाद शमशाद अली, वय २० वर्षे, व्यवसाय चालक, रा. भदारी काला पोस्ट-लालगंज, अझरा भद्रकाली लालगंज जि. प्रतापगड उत्तरपदेश, ३) नेनाराम छबुजी गुजर, वय ४८ वर्षे, व्यवसाय व्यापार, रा. नराणा, जि. राजसमन्द राजस्थान असे सांगितले. नमूद आयसर टेम्पोची तपासणी केली असता त्यामध्ये महाराष्ट्र राज्यात विक्रीकरीता प्रतिबंधीत असलेला ६,०६,१००/- रूपये किंमतीचा गुटखा व तंबाखूजन्य पदार्थ मिळून आला. त्यामुळे आयसर टेम्पोसह एकूण १६,०६,१००/- रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. नमूद आरोपींविरूध्द तलासरी पोलीस ठाणे येथे । १८६/२०२५ भारतीय न्याय संहिता सन २०२३ चे कलम १२३, २२३, २७४, २७५ सह अन्न सुरक्षा मानके कायदा २००६ चे कलम २३, २६ (२), २६ (२) (iv), २७, ३० (२) (अ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हयाचा पुढील तपास हा पोउपनि/जितेंद्र कांबळे नेम. तलासरी पोलीस ठाणे हे करत आहेत.

सदरची कारवाई ही श्री. यतिश देशमुख, पोलीस अधीक्षक, पालघर, श्री. विनायक नरळे, अपर पोलीस अधीक्षक, पालघर यांचे मार्गदर्शन व सुचनांप्रमाणे पोलीस निरीक्षक श्री. प्रदिप पाटील, पोउपनि/स्वप्नील सावंतदेसाई, पोहवा /९२१ भगवान आव्हाड, पोअमं/२९६ बजरंग अमनवाड, पोअमं/१६९९ नरेश घाटाळ, पोअमं/१२९८ विशाल कडव सर्व नेमणुक स्थानिक गुन्हे शाखा, पालघर यांनी केली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

दिव्यात नालेसफाईच्या कामात मोठ्या भ्रष्टाचाराचा आरोप; प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह

दिव्यात नालेसफाईच्या कामात मोठ्या भ्रष्टाचाराचा आरोप; प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह दिवा | प्रतिनिधी दिवा प्रभाग समिती अंतर्गत सुरू असलेल्या नालेसफाईच्या कामांमध्ये मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार होत असल्याचा गंभीर...

कल्याण वालधुनी बुद्धभूमी प्रकरणाने बौद्ध समाजात संतापाची लाट; अन्यायाविरोधात एकजुटीचे आवाहन ऑल इंडिया पँथर...

कल्याण वालधुनी बुद्धभूमी प्रकरणाने बौद्ध समाजात संतापाची लाट; अन्यायाविरोधात एकजुटीचे आवाहन ऑल इंडिया पँथर सेनेचे निवेदन  कल्याण : कल्याण येथील वालधुनी बुद्धभूमी परिसरात सुरू असलेल्या...

कोकण रेल्वे भरती प्रक्रियेवर महाराष्ट्रातून संताप १३२ जागांसाठी भरती; मुलाखती मात्र विशाखापट्टणम येथे...

कोकण रेल्वे भरती प्रक्रियेवर महाराष्ट्रातून संताप १३२ जागांसाठी भरती; मुलाखती मात्र विशाखापट्टणम येथे — स्थानिक तरुणांवर अन्यायाचा आरोप मुंबई | प्रतिनिधी कोकण रेल्वे महामंडळाच्या (KRCL) १३२ विविध...

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षात राहुल शिंदे यांचा जाहीर प्रवेश

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षात राहुल शिंदे यांचा जाहीर प्रवेश दिवा प्रतिनिधी : रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाचे दिवंगत लोकनेते एकनाथ भगत यांच्या समाजाभिमुख...

दिव्यातील नालेसफाईवर मनसे आक्रमक; प्रशासनाच्या दाव्यांवर उपस्थित केले गंभीर प्रश्न

दिव्यातील नालेसफाईवर मनसे आक्रमक; प्रशासनाच्या दाव्यांवर उपस्थित केले गंभीर प्रश्न दिवा | प्रतिनिधी पावसाळा तोंडावर असताना दिवा शहरातील नालेसफाईची कामे अत्यंत संथ गतीने सुरू असल्याचा आरोप...

error: Content is protected !!