*दिवा शहरात उभा राहणार छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा*
*पुतळ्याच्या निर्मितीसाठी 2 कोटी रुपयांचा निधी मंजूर*
दिवा शहराच्या पूर्वेला मध्यभागी प्रवेशद्वाराजवळ चौकात छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा उभा रहावा अशी दिवा शहरातील तमाम शिवप्रेमींची जुनी मागणी होती. दिवावसीयांच्या लोकभावनेचा विचार करून तत्कालीन मुख्यमंत्री व विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी छत्रपती शिवाजी महाराज चौकात शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा उभा करणार असल्याची घोषणा दोन वर्षापूर्वी केली होती त्यानुसार कार्यसम्राट खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे महाराजांच्या पुतळ्याच्या निर्मितीसाठी 2 कोटीचा निधी नुकताच मंजूर झाला आहे. खासदार डॉ श्रीकांत शिंदे व शिवसेना दिवा शहरप्रमुख, माजी उपमहापौर रमाकांत मढवी यांनी यापूर्वीच त्यासंदर्भात ठराव महापालिकेत प्रशासनाकडून करून घेतला. ठाणे महानगर पालिका यांनी जारी केलेल्या पत्रात ठराव क्रमांक १०० दिनांक २५/०७/२०२४ अन्वये प्रशासकीय मान्यता प्राप्त झाली असून या कामी सद्यस्थितीत विभागामार्फत शिल्पकाराची निवड करण्याची कार्यवाही सुरू असल्याचे म्हटले आहे. शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळ्यास पर्याप्त निधी उपलब्ध व्हावा व विविध प्रशासकीय मंजुरी मिळवण्यासाठी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे हे सुद्धा प्रयत्नशील होते असे शिवसेना शहरप्रमुख रमाकांत मढवी यांनी सांगितले आहे. ह्या बातमीने दिवा शहरातील तमाम शिवभक्तांना मोठा आनंद झाला असून त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आणि खासदार डॉ श्रीकांतजी शिंदे व शिवसेना शहरप्रमुख रमाकांत मढवी यांचे आभार मानले आहेत.

मुख्य संपादक: संदीप जाधव





















