Homeमहत्त्वाचेअनधिकृत बांधकाम म्हणजे काय आणि त्यावर्ती होणारी कारवाई म्हणजे काय नागरिक चिंतेत...

अनधिकृत बांधकाम म्हणजे काय आणि त्यावर्ती होणारी कारवाई म्हणजे काय नागरिक चिंतेत दिव्यात रूम घ्यावी कि नाही

*ठाणे महापालिका क्षेत्रातील १५१ अनधिकृत बांधकामांवर कारवाई*
मात्र अनधिकृत बांधकामांवर कारवाई आकडेवारी देणाऱ्यां अधिकाऱ्यांवर यापूर्वीच लागलेले भ्रष्टाचाराचे आरोप…
आयुक्तांनी जागेवर जाऊन कारवाई ची तपासणी केली आहे का…..ठाणेकरांचा सवाल…

११७ बांधकामे पूर्णपणे निष्कासित, ३४ बांधकामांतील वाढीव बांधकाम हटवले*
• *१९ जूनपासून नियमितपणे ही कारवाई सुरू*

*ठाणे मा. उच्च न्यायालयाने दिलेले निर्देश आणि प्रभाग समितीच्या बीट निरिक्षकांनी केलेल्या पाहणीत आढळलेल्या १५१ अनधिकृत बांधकामांवर महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाने आतापर्यंत कारवाई केली आहे. १९ जूनपासून नियमितपणे ही कारवाई सुरू असून त्यात शीळ येथील एम के कम्पाऊंडमधील २१ इमारतींच्या पाडकमांचाही समावेश आहे. या १५१ अनधिकृत बांधकामांपैकी ११७ बांधकामे पूर्णपणे निष्कासित करण्यात आली आहेत. तर, ३४ बांधकामांमधील अनधिकृत वाढीव बांधकाम हटवण्यात आले आहे.

ठाणे महापालिका क्षेत्रात, १९ जूनपासून नियमितपणे अतिक्रमण विरोधी पथकाची कारवाई सुरू आहे. त्यासाठी नऊ प्रभाग समिती क्षेत्रांमध्ये उपायुक्त दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या नेतृत्त्वात विशेष पथकांची महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी नियुक्ती केली आहे.

प्रभाग समिती क्षेत्रात बीट निरीक्षकांनी नोंदलेली आणि सध्या सुरू असलेली अनधिकृत बांधकामे पाडण्यास या मोहिमेत प्राधान्य आहे. आतापर्यंत तोडण्यात आलेल्या अनधिकृत बांधकामांमध्ये ११७ बांधकामे पूर्णपणे पाडली आहेत. तर, ३४ या बांधकामांमधील अनधिकृत वाढीव बांधकामे हटवण्यात आल्याची माहिती उपायुक्त (अतिक्रमण विभाग) शंकर पाटोळे यांनी दिली.

महापालिका क्षेत्रात अनधिकृत चाळी, अनधिकृत बैठी बांधकामे, वाढीव शेड, वाढीव बांधकाम, प्लिंथचे बांधकाम, अनधिकृत टर्फ या प्रकारच्या बांधकामांवर कारवाई करण्यात आली आहे. ही कारवाई नियमितपणे सुरू राहणार असल्याची माहितीही उपायुक्त पाटोळे यांनी दिली.

या मोहिमेची अमलबजावणी आणि प्रत्यक्ष कारवाई यांचा दैनंदिन स्वरुपातील आढावा अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे घेत आहेत. अतिक्रमण विरोधी कारवाईमध्ये उपायुक्त (परिमंडळ), सर्व सहाय्यक आयुक्त, कार्यकारी अभियंता, अतिक्रमण आणि बांधकाम विभागाचे अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले. या कारवाईसाठी पोकलेन, जेसीबी, गॅस कटर, ट्रॅ्क्टर ब्रेकर, मनुष्यबळ यांचा वापर करण्यात येत आहे. पोलीस आणि महाराष्ट्र सुरक्षा बलाचे जवान यांच्या बंदोबस्तात ही कारवाई करण्यात येत आहे.

*कारवाईच्या आकडेवारीचा तक्ता*
*(१९ जून ते २४ जुलैपर्यंतची आकडेवारी)*
• नौपाडा-कोपरी – १०
• दिवा – ४०
• मुंब्रा – २०
• कळवा – १७
• उथळसर – १०
• माजिवडा-मानपाडा – २६
• वर्तक नगर – ११
• लोकमान्य नगर – १३
• वागळे इस्टेट – ०४
• एकूण – १५१वरील अनधिकृत बांधकामांचे संदर्भातील कारवाई आकडेवारी देणारे अधिकाऱ्यांवर यापूर्वीच भ्रष्टाचाराचे आरोप झाले असताना सदरची आकडेवारी खरी कशी ?… आयुक्तांनी जागेवर जाऊन तपासलेली आहे का?ठाणे मनपा ने प्रसिद्ध केलेले फोटो, व्हिडिओ यांच्या स्थळांची माहिती दिली का नाही?सदर ची अनधिकृत बांधकामे एका दिवसात उभी राहिली नाही मग अनधिकृत बांधकामांना जबाबदार असणाऱ्या अधिकाऱ्यावर आयुक्त कारवाई का करत नाहीत?ठाणेकरांचे असंख्य सवाल…. 

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

दिव्यात नालेसफाईच्या कामात मोठ्या भ्रष्टाचाराचा आरोप; प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह

दिव्यात नालेसफाईच्या कामात मोठ्या भ्रष्टाचाराचा आरोप; प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह दिवा | प्रतिनिधी दिवा प्रभाग समिती अंतर्गत सुरू असलेल्या नालेसफाईच्या कामांमध्ये मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार होत असल्याचा गंभीर...

कल्याण वालधुनी बुद्धभूमी प्रकरणाने बौद्ध समाजात संतापाची लाट; अन्यायाविरोधात एकजुटीचे आवाहन ऑल इंडिया पँथर...

कल्याण वालधुनी बुद्धभूमी प्रकरणाने बौद्ध समाजात संतापाची लाट; अन्यायाविरोधात एकजुटीचे आवाहन ऑल इंडिया पँथर सेनेचे निवेदन  कल्याण : कल्याण येथील वालधुनी बुद्धभूमी परिसरात सुरू असलेल्या...

कोकण रेल्वे भरती प्रक्रियेवर महाराष्ट्रातून संताप १३२ जागांसाठी भरती; मुलाखती मात्र विशाखापट्टणम येथे...

कोकण रेल्वे भरती प्रक्रियेवर महाराष्ट्रातून संताप १३२ जागांसाठी भरती; मुलाखती मात्र विशाखापट्टणम येथे — स्थानिक तरुणांवर अन्यायाचा आरोप मुंबई | प्रतिनिधी कोकण रेल्वे महामंडळाच्या (KRCL) १३२ विविध...

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षात राहुल शिंदे यांचा जाहीर प्रवेश

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षात राहुल शिंदे यांचा जाहीर प्रवेश दिवा प्रतिनिधी : रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाचे दिवंगत लोकनेते एकनाथ भगत यांच्या समाजाभिमुख...

दिव्यातील नालेसफाईवर मनसे आक्रमक; प्रशासनाच्या दाव्यांवर उपस्थित केले गंभीर प्रश्न

दिव्यातील नालेसफाईवर मनसे आक्रमक; प्रशासनाच्या दाव्यांवर उपस्थित केले गंभीर प्रश्न दिवा | प्रतिनिधी पावसाळा तोंडावर असताना दिवा शहरातील नालेसफाईची कामे अत्यंत संथ गतीने सुरू असल्याचा आरोप...

error: Content is protected !!