*⭕दिव्यातील बेतवडे गावाजवळ बुलेट ट्रेनचे काम सुरु असलेल्या लाईनचे साहित्य चोरणारे दोघे अटकेत.*
ठाणे, दिवा ता १२ ऑक्टो : दिवा शहराजवळील बुलेट ट्रेनचे काम असलेल्या लाईनचे साहित्य चोरणारे दोघांना २४ तासात अटक करण्यात मुंब्रा पोलीस स्टेशन अंतर्गत दिवा पोलिसांना यश आले आहे. दिवा शहराजवळील बेतवडे गावाजवळ बुलेट ट्रेन लाईनचे पिलर तयार करण्यासाठी लागणारे L&T कंपनीचे जॅक रात्री दोघांनी ज्युपिटर स्कूटरवर चोरी करून पसार झाले होते प्रकरणी बुलेट ट्रेन कामगार यांच्या लक्षात आल्यावर त्यांनी तात्काळ मुंब्रा पोलीस ठाणे अंतर्गत दिवा पोलिसांना फिर्यादी यांनी कळविले. दिव्यातील बेतवडे गाव येथे 1,54,000 चे पिलर उभे करण्याचे (एकूण ७ जॅक) साहित्य चोरीस गेले आहे अशी तक्रार दिवा पोलीस चौकीत केली असता पोलिसांनी गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून तात्काळ आपली चक्रे फिरवत आरोपी चोरांच्या चोवीस तासाच्या आत मुसक्या आवळण्यास यश आले आहे.
सदर गुन्ह्यात अटक आरोपी १) सागर आनंद देवरूखकर, वय ३६ वर्षे व २) सुनिल तुकाराम सुरवाडे, वय ३८ वर्षे यांस भारतीय न्याय संहिता ३०३ (२) ३ (५) अन्वये अटक करत आरोपीची रवानगी ठाणे कारागृहात करण्यात आलेली आहे. सदर कामगिरी मुंब्रा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस उपनिरीक्षक सुभाष मोरे व टीमने केली आहे

मुख्य संपादक: संदीप जाधव





















