Homeक्राईमहिमाचल प्रदेशातील सरकारी शाळेत ८ वर्षांच्या दलित विद्यार्थ्यावर अमानुष जातीय छळ! विंचू...

हिमाचल प्रदेशातील सरकारी शाळेत ८ वर्षांच्या दलित विद्यार्थ्यावर अमानुष जातीय छळ! विंचू ठेवले, मारहाणीने कानातून रक्त; ॲड. प्रकाश आंबेडकरांचा संताप

मुंबई: काँग्रेसशासित हिमाचल प्रदेशातील एका सरकारी शाळेत ८ वर्षांच्या दलित विद्यार्थ्याला शाळेच्या मुख्याध्यापकासह दोन शिक्षकांकडून दीर्घकाळ आणि वारंवार शारीरिक व जातीय छळ (Caste Atrocity) सहन करावा लागल्याची अत्यंत गंभीर आणि धक्कादायक घटना समोर आली आहे. वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी आपल्या अधिकृत ‘X’ हँडलवरून ट्विट करत या घटनेचा निषेध केला आहे आणि देशातील राजकीय पक्षांवर निशाणा साधला आहे

मारहाणीचे स्वरूप इतके क्रूर होते की विद्यार्थ्याच्या कानातून रक्त आले. आणि सर्वात धक्कादायक म्हणजे, जबरदस्तीने कपडे काढून, आरोपींनी विद्यार्थ्याच्या पॅन्टमध्ये विंचू ठेवला. तसेच ॲड प्रकाश आंबेडकर म्हणाले की, याच शाळेत नेपाळी आणि दलित विद्यार्थ्यांना उच्च जातीच्या विद्यार्थ्यांपासून वेगळे बसवले जाते.

भाजप-काँग्रेसवर तीव्र टीका

या घटनेच्या निमित्ताने ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी भाजप आणि काँग्रेस या दोन्ही प्रमुख पक्षांवर सडकून टीका केली आहे.

“भाजप आणि काँग्रेस हे दोन्ही पक्ष वेगवेगळे मुखवटे घालतात, पण जातीय व्यवस्थेचीच सेवा करतात. मतांसाठी आणि केवळ दाखवण्यासाठी दलितांच्या सन्मानाचा व्यापार करतात,” असे त्यांनी म्हटले आहे.

ते पुढे म्हणतात, “ते एकमेकांच्या विरोधात ओरडतात, पण दलित अत्याचारातील त्यांची मिलीभगत तीच आहे. दलितांसाठी सत्ताधीश बदलतात, पण वेदना कायम राहते.”

या गंभीर घटनेनंतर त्यांनी दलितांना बाबासाहेब आंबेडकर यांनी दाखवलेला नवा मार्ग स्वीकारण्याचे आणि राजकीय पर्याय निर्माण करण्याचे आवाहन केले आहे. त्यांनी प्रश्न उपस्थित केला आहे की, “दलित कधी उठून बाबासाहेबांनी पाहिलेला नवा मार्ग निवडतील – एक पर्याय निर्माण करतील?”

#PrakashAmbedkar #VanchitBahujanAghadi #DalitAtrocity #HimachalPradesh #CasteDiscrimination #StopCasteViolence #JusticeForDalitStudent #AmbedkariteMovement #SocialJustice #EndCasteism

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

दिव्यात नालेसफाईच्या कामात मोठ्या भ्रष्टाचाराचा आरोप; प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह

दिव्यात नालेसफाईच्या कामात मोठ्या भ्रष्टाचाराचा आरोप; प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह दिवा | प्रतिनिधी दिवा प्रभाग समिती अंतर्गत सुरू असलेल्या नालेसफाईच्या कामांमध्ये मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार होत असल्याचा गंभीर...

कल्याण वालधुनी बुद्धभूमी प्रकरणाने बौद्ध समाजात संतापाची लाट; अन्यायाविरोधात एकजुटीचे आवाहन ऑल इंडिया पँथर...

कल्याण वालधुनी बुद्धभूमी प्रकरणाने बौद्ध समाजात संतापाची लाट; अन्यायाविरोधात एकजुटीचे आवाहन ऑल इंडिया पँथर सेनेचे निवेदन  कल्याण : कल्याण येथील वालधुनी बुद्धभूमी परिसरात सुरू असलेल्या...

कोकण रेल्वे भरती प्रक्रियेवर महाराष्ट्रातून संताप १३२ जागांसाठी भरती; मुलाखती मात्र विशाखापट्टणम येथे...

कोकण रेल्वे भरती प्रक्रियेवर महाराष्ट्रातून संताप १३२ जागांसाठी भरती; मुलाखती मात्र विशाखापट्टणम येथे — स्थानिक तरुणांवर अन्यायाचा आरोप मुंबई | प्रतिनिधी कोकण रेल्वे महामंडळाच्या (KRCL) १३२ विविध...

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षात राहुल शिंदे यांचा जाहीर प्रवेश

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षात राहुल शिंदे यांचा जाहीर प्रवेश दिवा प्रतिनिधी : रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाचे दिवंगत लोकनेते एकनाथ भगत यांच्या समाजाभिमुख...

दिव्यातील नालेसफाईवर मनसे आक्रमक; प्रशासनाच्या दाव्यांवर उपस्थित केले गंभीर प्रश्न

दिव्यातील नालेसफाईवर मनसे आक्रमक; प्रशासनाच्या दाव्यांवर उपस्थित केले गंभीर प्रश्न दिवा | प्रतिनिधी पावसाळा तोंडावर असताना दिवा शहरातील नालेसफाईची कामे अत्यंत संथ गतीने सुरू असल्याचा आरोप...

error: Content is protected !!