दिवा (प्रतिनिधी):
भिमस्वराज्य प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य (दिवा) यांच्या वतीने शांतीदूत तथागत गौतम बुद्ध, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, छत्रपती शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या संयुक्त जयंतीनिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
या कार्यक्रमात प्रतिष्ठानचे सभासद व कार्यकारिणी सदस्यांच्या उपस्थितीत महापुरुषांना अभिवादन करण्यात आले. यावेळी सांस्कृतिक कार्यक्रमांतर्गत गीत गायनाचा कार्यक्रम पार पडला. गायक सोनू जाधव आणि कमल म्हस्के यांनी आपल्या सुमधुर आवाजात उपस्थितांना मंत्रमुग्ध केले.
तसेच स्थानिक कमिटीची रचना पुढीलप्रमाणे आहे —
संस्थापक: किरण पवार
अध्यक्ष: लक्ष्मण पवार
उपाध्यक्ष: नागेश मोरे
उपाध्यक्षा: आश्लेषा पवार
सचिव: रत्नदीप पवार
उपसचिव: अक्षय मोहिते
खजिनदार: विनोद पवार
उपखजिनदार: जितेश तांबे
ऑडिटर: र. परशुराम जावळे
विश्वस्त: मंगेश जाधव, योगीराज किर्दक, शंकर चव्हाण
सभासद: संदीप जाधव, राजेंद्र पाटणे, धम्मदीप पवार, संघरक्षक कांबळे, रवी सिंग, सुमित गायकवाड, प्रतिक जाधव, महेंद्र गमरे, स्वयम खैरे, अर्जुन पवार, दीपक चांदुसकर, अरविंद जैस्वाल, कनिष्क मोरे, ऋषाल मोरे, निलेश कासारे, प्रमोद मोहिते, प्रमोद पाटणे, योगेश साळवे, सचिन जाधव, शांताराम जाधव, संतोष कुरे, विकास पवार, जयेश जाधव, नरेश शिंदे.
कार्यक्रमात समाजात एकता, समता आणि बंधुभावाचे विचार रुजवण्याचा संदेश देण्यात आला. उपस्थितांनी महापुरुषांच्या विचारांवर चालण्याचा संकल्प व्यक्त केला.

मुख्य संपादक: संदीप जाधव





















