Homeक्राईमपरळी : रेल्वे स्टेशनवर मानवतेला हादरवून टाकणारी घटना घडली आहे. अनुसूचित जातीच्या...

परळी : रेल्वे स्टेशनवर मानवतेला हादरवून टाकणारी घटना घडली आहे. अनुसूचित जातीच्या सहा वर्षीय चिमुरडीवर नराधमाने पाशवी अत्याचार केला आहे.

✅ परळी : रेल्वे स्टेशनवर मानवतेला हादरवून टाकणारी घटना घडली आहे. अनुसूचित जातीच्या सहा वर्षीय चिमुरडीवर नराधमाने पाशवी अत्याचार केला आहे. ही सहा वर्षांची चिमुरडी अतिशय गरीब कुटुंबातील असून परळीत काही काम मिळेल या आशेने हे कुटुंब परळीत आले होते. नवरा-बायकोची तब्येत थोडी खराब असल्यामुळे ते गोळ्या खाऊन झोपले होते. तेवढ्यात सहा वर्षांची ही चिमुरडी बाजूला खेळत होती. नराधम आरोपीने तिला फूस लावून चॉकलेट दाखवत निर्जन स्थळी नेऊन पाशवी अत्याचार केला.

अत्यंत जखमी अवस्थेत रेल्वे पोलिसांनी तिला संभाजीनगर पोलीस स्टेशन, परळी यांच्याकडे दिले. मुलगी सध्या अंबाजोगाई सरकारी रुग्णालयात दाखल असून मी तिच्या वडिलांशी फोनवर बोललो आहे. तात्काळ ऑल इंडिया पॅंथर सेनेचे जिल्हा नेते विजय बाबा कांबळे यांनी धाव घेऊन कुटुंबाला धीर दिला आणि मुलीच्या तब्येतीची विचारपूस केली.

सध्या ती जखमी अवस्थेत असून डॉक्टरांनी तिची योग्य प्रकारे काळजी घ्यावी अशी त्यांनी मागणी केली आहे. रेल्वे पोलिसांशी मी स्वतः फोनवर बोललो असून सीसीटीव्ही कॅमेरे तपासून पोलिसांच्या साहाय्याने आरोपीचा शोध घेण्याचे काम सुरू केले आहे. ऑल इंडिया पॅंथर सेना मागणी करत आहे की अशा निर्दयी नराधमाला तात्काळ अटक करून कठोरात कठोर कारवाई झाली पाहिजे.

या पीडित कुटुंबाला राज्य सरकारने २५ लाखांची आर्थिक मदत केली पाहिजे. त्या मुलीचा जीव वाचवण्यासाठी राज्य सरकारने तिला चांगल्या रुग्णालयात उपचाराची सोय करून दिली पाहिजे. रेल्वे स्टेशनसारखी ठिकाणेसुद्धा सुरक्षित नाहीत, चिमुरड्या सुरक्षित नाहीत, राज्यामध्ये महिला सुरक्षित नाहीत. ही घटना दिवसाढवळ्या घडली आहे.

ऑल इंडिया पॅंथर सेना या घटनेचा जाहीर निषेध करत आहे. दलित बालीकेला न्याय मिळालाच पाहिजे. बीड पोलीस अधीक्षकांनी तात्काळ गंभीर कारवाई करावी आणि गृहमंत्र्यांनी या घटनेची दखल घ्यावी.

#AllindiaPantherSena

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

दिव्यात नालेसफाईच्या कामात मोठ्या भ्रष्टाचाराचा आरोप; प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह

दिव्यात नालेसफाईच्या कामात मोठ्या भ्रष्टाचाराचा आरोप; प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह दिवा | प्रतिनिधी दिवा प्रभाग समिती अंतर्गत सुरू असलेल्या नालेसफाईच्या कामांमध्ये मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार होत असल्याचा गंभीर...

कल्याण वालधुनी बुद्धभूमी प्रकरणाने बौद्ध समाजात संतापाची लाट; अन्यायाविरोधात एकजुटीचे आवाहन ऑल इंडिया पँथर...

कल्याण वालधुनी बुद्धभूमी प्रकरणाने बौद्ध समाजात संतापाची लाट; अन्यायाविरोधात एकजुटीचे आवाहन ऑल इंडिया पँथर सेनेचे निवेदन  कल्याण : कल्याण येथील वालधुनी बुद्धभूमी परिसरात सुरू असलेल्या...

कोकण रेल्वे भरती प्रक्रियेवर महाराष्ट्रातून संताप १३२ जागांसाठी भरती; मुलाखती मात्र विशाखापट्टणम येथे...

कोकण रेल्वे भरती प्रक्रियेवर महाराष्ट्रातून संताप १३२ जागांसाठी भरती; मुलाखती मात्र विशाखापट्टणम येथे — स्थानिक तरुणांवर अन्यायाचा आरोप मुंबई | प्रतिनिधी कोकण रेल्वे महामंडळाच्या (KRCL) १३२ विविध...

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षात राहुल शिंदे यांचा जाहीर प्रवेश

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षात राहुल शिंदे यांचा जाहीर प्रवेश दिवा प्रतिनिधी : रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाचे दिवंगत लोकनेते एकनाथ भगत यांच्या समाजाभिमुख...

दिव्यातील नालेसफाईवर मनसे आक्रमक; प्रशासनाच्या दाव्यांवर उपस्थित केले गंभीर प्रश्न

दिव्यातील नालेसफाईवर मनसे आक्रमक; प्रशासनाच्या दाव्यांवर उपस्थित केले गंभीर प्रश्न दिवा | प्रतिनिधी पावसाळा तोंडावर असताना दिवा शहरातील नालेसफाईची कामे अत्यंत संथ गतीने सुरू असल्याचा आरोप...

error: Content is protected !!