Homeक्राईमआमच्या हद्दीत अवैध धंदा नाही"; पोलिसांना आता थेट लेखी द्यावं लागणार, सापडल्यास...

आमच्या हद्दीत अवैध धंदा नाही”; पोलिसांना आता थेट लेखी द्यावं लागणार, सापडल्यास दणका; आयुक्तांचा कठोर इशारा

 “आमच्या हद्दीत अवैध धंदा नाही”; पोलिसांना आता थेट लेखी द्यावं लागणार, सापडल्यास दणका; आयुक्तांचा कठोर इशारा

अवैध धंद्यांवर कारवाईची मोहीम सुरू असली तरी आता एखादी चूक, एखादे दुर्लक्ष किंवा एखाद्या अवैध धंद्याकडे केलेला कानाडोळा संबंधित अधिकाऱ्याला फार महागात पडणार आहे.

श्रीकृष्ण पांचाळ, पिंपरी- चिंचवड: फुगेवाडीतील विषारी दारूकांडात नागरिकांचा बळी गेल्यानंतर अखेर पिंपरी- चिंचवड पोलिस दलात मोठी खळबळ उडाली आहे. या घटनेनंतर पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी थेट पोलिस ठाण्यांच्या कारभारावरच प्रश्नचिन्ह उपस्थित करत अवैध धंद्यांना पाठीशी घालणाऱ्यांवर कठोर कारवाईचा इशारा दिला आहे. “हद्दीत अवैध धंदे सुरू असतील तर संबंधित अधिकारी जबाबदार असेल”, असा स्पष्ट संदेश पोलीस आयुक्तांनी दिला आहे. त्यामुळे आता पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयातील प्रत्येक वरिष्ठ पोलीस निरीक्षक, एसीपी आणि डीसीपी यांच्यावर जबाबदारीचे मोठे ओझे आले आहे.

फुगेवाडीतील विषारी दारूमुळे शहरातील 12 जणांचा मृत्यू झाला, तर पुण्यातही काहींना आपला जीव गमवावा लागला. या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरला. राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू झाले. पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्न उपस्थित झाले. पिंपरी-चिंचवड पोलिसांची प्रतिमा डागाळली गेली. यानंतर पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी तातडीने दापोडी पोलीस ठाणे आणि गुन्हे शाखेतील संबंधित अधिकाऱ्यांना निलंबित करून कठोर संदेश दिला. मात्र आता केवळ निलंबनावर कारवाई थांबलेली नाही. भविष्यात अशी घटना पुन्हा घडू नये म्हणून पोलीस आयुक्तांनी संपूर्ण यंत्रणेलाच सतर्कतेचा इशारा दिला आहे. यापुढे प्रत्येक वरिष्ठ पोलीस निरीक्षकाला आपल्या हद्दीत हातभट्टी, मटका, जुगार, अवैध दारू विक्री किंवा इतर कोणताही बेकायदेशीर धंदा सुरू नसल्याचे दर महिन्याला लेखी प्रमाणपत्र द्यावे लागणार आहे. तसंच फक्त प्रमाणपत्र देऊन चालणार नाही, तर एसीपी आणि डीसीपी यांनी त्याची प्रत्यक्ष पडताळणी करायची आहे. एखाद्या अधिकाऱ्याने “हद्दीत अवैध धंदा नाही” असे प्रमाणपत्र दिले आणि नंतर प्रत्यक्षात अवैध धंदा सुरू असल्याचे आढळले, तर संबंधित अधिकाऱ्यावर थेट कारवाई होणार आहे

विशेष म्हणजे, अवैध धंद्यांना प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष पाठबळ दिल्याचे सिद्ध झाल्यास कोणत्याही अधिकाऱ्याची गय केली जाणार नाही, असा स्पष्ट इशारा पोलीस आयुक्तांनी दिला आहे. त्यामुळे आता केवळ पोलीस निरीक्षकच नव्हे तर एसीपी आणि डीसीपी यांच्यावरही कारवाईची टांगती तलवार असल्याची चर्चा पोलीस दलात सुरू आहे. फुगेवाडी दारूकांडानंतर शहरातील अनेक भागांत पोलिसांनी धडक कारवाया सुरू केल्या आहेत. पिंपरी, चिखली, शिरगाव, तळेगाव, तळेगाव एमआयडीसी, उत्तर आणि दक्षिण म्हाळुंगे, चाकण, निगडी या भागांत हातभट्टी दारूचे अड्डे उद्ध्वस्त करण्यात आले आहेत. अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात हातभट्टी दारू, रसायने आणि साहित्य जप्त करण्यात आले आहे.

दरम्यान, दुचाकीवरून हातभट्टी दारूची विक्री सुरू असल्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. या प्रकारांचीही पोलिसांनी गंभीर दखल घेतली असून अशा टोळ्यांवर कारवाईसाठी स्वतंत्र पथके सक्रिय करण्यात आली आहेत. फुगेवाडीतील 12 मृत्यूंनी केवळ सामान्य नागरिकांचाच नाही तर संपूर्ण पोलिस यंत्रणेचाही धडा घेतला आहे. त्यामुळे आता प्रत्येक पोलीस ठाण्याची कसून परीक्षा होणार आहे. हद्दीत अवैध धंदा सापडला तर थेट अधिकाऱ्यांची खुर्ची धोक्यात येऊ शकते. एकंदरीत, फुगेवाडी दारूकांडानंतर पिंपरी-चिंचवड पोलिस दलात “झिरो टॉलरन्स” धोरण लागू झाल्याचे चित्र आहे.

दरम्यान, “पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध धंदे सुरू नसल्याचे दर महिन्याला प्रमाणपत्र द्यावे लागेल. केवळ प्रमाणपत्र देऊन चालणार नाही, तर त्याची पडताळणीही केली जाईल. अवैध धंद्यांना पाठीशी घालणाऱ्या किंवा दुर्लक्ष करणाऱ्या कोणत्याही अधिकाऱ्याची गय केली जाणार नाही,” असा इशारा पिंपरी- चिंचवडचे पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी दिला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

लग्नाच्या आग्रहातून प्रेयसीची निर्घृण हत्या; पुरावे नष्ट करण्यासाठी मृतदेह जाळल्याचा आरोप

लग्नाच्या आग्रहातून प्रेयसीची निर्घृण हत्या; पुरावे नष्ट करण्यासाठी मृतदेह जाळल्याचा आरोप पनवेल | प्रतिनिधी लग्नासाठी सातत्याने होत असलेल्या आग्रहाला कंटाळून प्रेयसीची हत्या करून तिचा मृतदेह जंगलात...

भारतीय न्यायव्यवस्थेत महिला नेतृत्वाचा ऐतिहासिक टप्पा; एकाच वेळी चार महिला उच्च न्यायालयांच्या मुख्य न्यायमूर्ती

भारतीय न्यायव्यवस्थेत महिला नेतृत्वाचा ऐतिहासिक टप्पा; एकाच वेळी चार महिला उच्च न्यायालयांच्या मुख्य न्यायमूर्ती नवी दिल्ली प्रतिनिधी : भारतीय न्यायव्यवस्थेच्या इतिहासात प्रथमच एकाच वेळी चार...

मध्यरात्री पाठलाग करत घरी आला, मागून फ्रॅाकमध्ये हात घातला अन्.. वसईत धक्कादायक प्रकार

मध्यरात्री पाठलाग करत घरी आला, मागून फ्रॅाकमध्ये हात घातला अन्.. वसईत धक्कादायक प्रकार वसईमधून एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. एक महिला कामावरुन घरी जात...

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माजी आमदार सुभाष भोईर यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट विकासकामांबाबत सकारात्मक...

डोंबिवली / प्रतिनिधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे श्री पिंपळेश्वर महादेव भक्त मंडळ, डोंबिवली आयोजित कृतज्ञता सोहळा व जाहीर सत्कार कार्यक्रमासाठी डोंबिवली येथे आले असता त्यांनी...

दिव्यात शिवसेना ठाकरे गटाचे ‘गटर पूजन’ आंदोलन नालेसफाईच्या रखडलेल्या कामांवरून महापालिका प्रशासनाविरोधात संताप

दिव्यात शिवसेना ठाकरे गटाचे ‘गटर पूजन’ आंदोलन नालेसफाईच्या रखडलेल्या कामांवरून महापालिका प्रशासनाविरोधात संताप ठाणे | प्रतिनिधी पावसाळा तोंडावर आला असतानाही दिवा शहरातील नालेसफाईची कामे अद्याप अपूर्ण...

error: Content is protected !!