Homeक्राईममध्यरात्री पाठलाग करत घरी आला, मागून फ्रॅाकमध्ये हात घातला अन्.. वसईत धक्कादायक...

मध्यरात्री पाठलाग करत घरी आला, मागून फ्रॅाकमध्ये हात घातला अन्.. वसईत धक्कादायक प्रकार

मध्यरात्री पाठलाग करत घरी आला, मागून फ्रॅाकमध्ये हात घातला अन्.. वसईत धक्कादायक प्रकार

वसईमधून एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. एक महिला कामावरुन घरी जात असताना एका अज्ञात व्यक्तीने तिचा पाठलाग केला. त्यानंतर घर जवळ येताच त्याने महिलेला मागून स्पर्श करण्याचा प्रयत्न केला.

एक धक्कादायक घटना घडली आहे. एक महिला कामावरुन घरी जात असताना तिचा एका अज्ञात व्यक्तीने पाठलाग केला. तो तिच्या इमारतीपर्यंत पोहोचला. त्यानंतर त्याने महिलेला पाठीमागे जाऊन हळून स्पर्श करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर जे काही केलं त्याचा सीसीटीव्ही फूटेज पाहून पोलिसांना देखील धक्का बसला आहे. महिलेच्या तक्रारीनंतर पोलीस सध्या आरोपीचा शोध घेत आहेत. आता नेमकं काय घडलं? जाणून घ्या…

ही घटना वसईच्या माणिकपूर पोलीस ठाणे हद्दीत घडली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित महिला वसई पश्चिमेतून कामावरुन घरी परतत असताना एका अज्ञात व्यक्तीने तिचा पाठलाग केला. पाठलाग करत करत आरोपी तिच्या इमारतीपर्यंत पोहोचला. आजूबाजूला कोणी नसल्याचे पाहून त्याने महिलेच्या इमारतीच्या परिसरात तिचा विनयभंग केला. तो मागून हळूच महिलेच्या जवळ गेला. त्याने महिलेच्या फ्रॉकमध्ये खालून हात घालून तिचा विनयभंग केला. यासोबतच त्याने अश्लील कृत्य केल्याचाही आरोप करण्यात आहे.

पोलिसात तक्रार दाखल

या घटनेनंतर महिलेने तातडीने पोलिसात धाव घेतली. तिने या प्रकरणी तक्रार दाखल केली आहे. तक्रारीवरून पोलिसांनी भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ७४, ७५ आणि ७८ अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे. आरोपीने फिकट गुलाबी रंगाचा टी-शर्ट, काळी जीन्स आणि सँडल घातल्याचे तक्रारीत नमूद आहे. परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपीचा शोध घेतला जात आहे.

वसईमध्ये आणखी एक धक्कादायक घटना

वसईमधून आणखी एक भयानक घटना समोर आली आहे. वसई रेल्वे स्थानकाजवळील स्कायवॉकवर प्रेयसीच्या आई-वडिलांनी लग्नाला विरोध दर्शवल्याने नैराश्यात आलेल्या एका तरुणाने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. मात्र, माणिकपूर पोलिसांच्या तत्परतेमुळे त्याचा जीव वाचला. या घटनेसाठी पोलिसांचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे. ही घटना ५ जून रोजी रात्री सुमारे ८ वाजण्याच्या सुमारास घडली. लग्नाला नकार मिळाल्याने मानसिक तणावात असलेल्या तरुणाने स्कायवॉकच्या दिशेने धाव घेतली. मित्रांनी समजावण्याचा प्रयत्न केला, तरी तो कोणाचेच ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. अखेर त्याने स्कायवॉकच्या कठड्यावर चढून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

लग्नाच्या आग्रहातून प्रेयसीची निर्घृण हत्या; पुरावे नष्ट करण्यासाठी मृतदेह जाळल्याचा आरोप

लग्नाच्या आग्रहातून प्रेयसीची निर्घृण हत्या; पुरावे नष्ट करण्यासाठी मृतदेह जाळल्याचा आरोप पनवेल | प्रतिनिधी लग्नासाठी सातत्याने होत असलेल्या आग्रहाला कंटाळून प्रेयसीची हत्या करून तिचा मृतदेह जंगलात...

भारतीय न्यायव्यवस्थेत महिला नेतृत्वाचा ऐतिहासिक टप्पा; एकाच वेळी चार महिला उच्च न्यायालयांच्या मुख्य न्यायमूर्ती

भारतीय न्यायव्यवस्थेत महिला नेतृत्वाचा ऐतिहासिक टप्पा; एकाच वेळी चार महिला उच्च न्यायालयांच्या मुख्य न्यायमूर्ती नवी दिल्ली प्रतिनिधी : भारतीय न्यायव्यवस्थेच्या इतिहासात प्रथमच एकाच वेळी चार...

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माजी आमदार सुभाष भोईर यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट विकासकामांबाबत सकारात्मक...

डोंबिवली / प्रतिनिधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे श्री पिंपळेश्वर महादेव भक्त मंडळ, डोंबिवली आयोजित कृतज्ञता सोहळा व जाहीर सत्कार कार्यक्रमासाठी डोंबिवली येथे आले असता त्यांनी...

दिव्यात शिवसेना ठाकरे गटाचे ‘गटर पूजन’ आंदोलन नालेसफाईच्या रखडलेल्या कामांवरून महापालिका प्रशासनाविरोधात संताप

दिव्यात शिवसेना ठाकरे गटाचे ‘गटर पूजन’ आंदोलन नालेसफाईच्या रखडलेल्या कामांवरून महापालिका प्रशासनाविरोधात संताप ठाणे | प्रतिनिधी पावसाळा तोंडावर आला असतानाही दिवा शहरातील नालेसफाईची कामे अद्याप अपूर्ण...

आमच्या हद्दीत अवैध धंदा नाही”; पोलिसांना आता थेट लेखी द्यावं लागणार, सापडल्यास दणका; आयुक्तांचा...

 "आमच्या हद्दीत अवैध धंदा नाही"; पोलिसांना आता थेट लेखी द्यावं लागणार, सापडल्यास दणका; आयुक्तांचा कठोर इशारा अवैध धंद्यांवर कारवाईची मोहीम सुरू असली तरी आता एखादी...

error: Content is protected !!