Homeआरोग्य१२ वर्षीय देवेंद्र सिंग मृत्यूप्रकरणी शिशिर रॉयविरुद्ध FIR दाखल; शिवसेना शाखेतून चालत...

१२ वर्षीय देवेंद्र सिंग मृत्यूप्रकरणी शिशिर रॉयविरुद्ध FIR दाखल; शिवसेना शाखेतून चालत होता उपचारांचा गोरखधंदा

दिव्यात बोगस डॉक्टरांविरोधात मोठी कारवाई

१२ वर्षीय देवेंद्र सिंग मृत्यूप्रकरणी शिशिर रॉयविरुद्ध FIR दाखल; शिवसेना शाखेतून चालत होता उपचारांचा गोरखधंदा

दिवा | प्रतिनिधी

दिवा परिसरात १२ वर्षीय देवेंद्र आशिष सिंग यांच्या मृत्यूप्रकरणी अखेर मोठी कायदेशीर कारवाई करण्यात आली असून बोगस डॉक्टर शिशिर रॉय याच्याविरोधात मुंब्रा पोलीस ठाण्यात अधिकृत FIR दाखल करण्यात आला आहे. या FIR मुळे दिवा, मुंब्रा आणि ठाणे परिसरात सुरू असलेल्या बोगस वैद्यकीय व्यवसायाचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे.

मुंब्रा पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आलेल्या FIR क्रमांक 0979/2026 नुसार आरोपी शिशिर रॉय याच्यावर भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 319, 336, 106 तसेच वैद्यकीय व्यवसाय अधिनियम 1961 अंतर्गत कलम 33 आणि 36 प्रमाणे गुन्हे नोंद करण्यात आले आहेत. ६ जून २०२६ रोजी सायंकाळी ५ वाजता ही माहिती पोलिसांना प्राप्त झाली असून त्यानंतर अधिकृत गुन्हा दाखल करण्यात आला.

या प्रकरणातील तक्रारदार म्हणून दिवा आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी डॉ. पल्लवी विलास वाघ यांनी अधिकृत तक्रार दाखल केली आहे. FIR मध्ये नमूद केल्यानुसार, ३ जून २०२६ रोजी वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रसाद पाटील यांना माहिती मिळाली की, दिव्यातील श्लोक नगर परिसरात एका बोगस डॉक्टरच्या उपचारामुळे १२ वर्षीय देवेंद्र आशिष सिंग याचा मृत्यू झाला आहे.

यानंतर आरोग्य विभागाच्या पथकाने संबंधित परिसरात चौकशी सुरू केली. चौकशीदरम्यान धक्कादायक माहिती समोर आली. शिशिर रॉय हा कोणतीही अधिकृत वैद्यकीय पदवी नसताना नागरिकांवर उपचार करत असल्याचे निष्पन्न झाले. विशेष म्हणजे, हा संपूर्ण प्रकार शिवसेना शाखेमधून सुरू असल्याचे तपासात समोर आले आहे.

FIR मध्ये नमूद केल्यानुसार, शाखाप्रमुख संजय म्हात्रे यांनी संबंधित जागा शिशिर रॉय याला उपचारासाठी उपलब्ध करून दिल्याचे सांगितले आहे. प्रत्यक्ष पाहणीवेळी त्या शाखेमध्ये टेबल, खुर्च्या, इंजेक्शने आणि औषधांचा साठा आढळून आला. त्यामुळे राजकीय कार्यालयातूनच बोगस दवाखाना सुरू होता का, असा गंभीर प्रश्न आता निर्माण झाला आहे.

तपासादरम्यान देवेंद्रच्या कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलाची प्रकृती बिघडल्यानंतर शिशिर रॉय याच्याकडून उपचार करण्यात आले होते. मात्र त्यानंतर देवेंद्रची प्रकृती अधिक खालावली. कुटुंबीयांनी नंतर शासकीय रुग्णालयात उपचार घेतले, परंतु अखेर देवेंद्रचा मृत्यू झाला.

FIR मध्ये आणखी एक गंभीर बाब समोर आली असून शिशिर रॉय हा अलोपॅथीचे शिक्षण घेतल्याचा दावा करत होता. मात्र त्याच्याकडे कोणतीही अधिकृत नोंदणी अथवा वैद्यकीय परवाना नसल्याचे स्पष्ट झाले आहे. नागरिकांच्या जीवाशी खेळत तो अनेक दिवस उपचार करत असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे.

या संपूर्ण प्रकरणामुळे दिवा परिसरात संतापाचे वातावरण निर्माण झाले असून बोगस डॉक्टरांना राजकीय संरक्षण कोण देत आहे, असा सवाल आता नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. गरीब आणि सर्वसामान्य नागरिकांच्या जीवाशी सुरू असलेल्या या धोकादायक खेळावर कठोर कारवाईची मागणी जोर धरत आहे.

दरम्यान, आरोग्य विभाग, अन्न व औषध प्रशासन (FDA) आणि पोलीस प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने दिवा, मुंब्रा, कळवा, ठाणे आणि माजिवडा परिसरात विशेष मोहीम राबविण्याची तयारी सुरू झाली आहे. बोगस डॉक्टर, अनधिकृत मेडिकल दुकाने आणि बनावट पॅथॉलॉजी लॅबवर मोठ्या प्रमाणात कारवाई होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

देवेंद्रच्या मृत्यूने संपूर्ण परिसर हादरला असून दोषींना कठोर शिक्षा द्यावी, आरोपींची मालमत्ता जप्त करावी आणि पीडित कुटुंबाला आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी विविध सामाजिक संघटनांकडून करण्यात येत आहे.

या प्रकरणातील पुढील तपास मुंब्रा पोलीस करत असून संपूर्ण ठाणे जिल्ह्याचे लक्ष आता या कारवाईकडे लागले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

लग्नाच्या आग्रहातून प्रेयसीची निर्घृण हत्या; पुरावे नष्ट करण्यासाठी मृतदेह जाळल्याचा आरोप

लग्नाच्या आग्रहातून प्रेयसीची निर्घृण हत्या; पुरावे नष्ट करण्यासाठी मृतदेह जाळल्याचा आरोप पनवेल | प्रतिनिधी लग्नासाठी सातत्याने होत असलेल्या आग्रहाला कंटाळून प्रेयसीची हत्या करून तिचा मृतदेह जंगलात...

भारतीय न्यायव्यवस्थेत महिला नेतृत्वाचा ऐतिहासिक टप्पा; एकाच वेळी चार महिला उच्च न्यायालयांच्या मुख्य न्यायमूर्ती

भारतीय न्यायव्यवस्थेत महिला नेतृत्वाचा ऐतिहासिक टप्पा; एकाच वेळी चार महिला उच्च न्यायालयांच्या मुख्य न्यायमूर्ती नवी दिल्ली प्रतिनिधी : भारतीय न्यायव्यवस्थेच्या इतिहासात प्रथमच एकाच वेळी चार...

मध्यरात्री पाठलाग करत घरी आला, मागून फ्रॅाकमध्ये हात घातला अन्.. वसईत धक्कादायक प्रकार

मध्यरात्री पाठलाग करत घरी आला, मागून फ्रॅाकमध्ये हात घातला अन्.. वसईत धक्कादायक प्रकार वसईमधून एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. एक महिला कामावरुन घरी जात...

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माजी आमदार सुभाष भोईर यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट विकासकामांबाबत सकारात्मक...

डोंबिवली / प्रतिनिधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे श्री पिंपळेश्वर महादेव भक्त मंडळ, डोंबिवली आयोजित कृतज्ञता सोहळा व जाहीर सत्कार कार्यक्रमासाठी डोंबिवली येथे आले असता त्यांनी...

दिव्यात शिवसेना ठाकरे गटाचे ‘गटर पूजन’ आंदोलन नालेसफाईच्या रखडलेल्या कामांवरून महापालिका प्रशासनाविरोधात संताप

दिव्यात शिवसेना ठाकरे गटाचे ‘गटर पूजन’ आंदोलन नालेसफाईच्या रखडलेल्या कामांवरून महापालिका प्रशासनाविरोधात संताप ठाणे | प्रतिनिधी पावसाळा तोंडावर आला असतानाही दिवा शहरातील नालेसफाईची कामे अद्याप अपूर्ण...

error: Content is protected !!