Homeताज्या बातम्यादिव्यात नालेसफाईचा फज्जा; संतप्त शिवसैनिक थेट नाल्यात उतरले

दिव्यात नालेसफाईचा फज्जा; संतप्त शिवसैनिक थेट नाल्यात उतरले

दिव्यात नालेसफाईचा फज्जा; संतप्त शिवसैनिक थेट नाल्यात उतरले

“पालिका प्रशासन झोपेत, दिवाकरांच्या जीवाशी खेळ सुरू”

ठाणे प्रतिनिधी :

दिवा शहरात मान्सूनपूर्व नालेसफाईच्या नावाखाली सुरू असलेल्या कथित भ्रष्टाचार आणि निष्क्रिय कारभाराविरोधात अखेर संतापाचा उद्रेक झाला असून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी थेट नाल्यात उतरून ठाणे महानगरपालिका प्रशासनाचा तीव्र निषेध केला.

मान्सून अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला असताना आणि ७ जून उलटल्यानंतरही दिव्यातील अनेक नाले कचऱ्याने तुडुंब भरलेले आहेत. दुसरीकडे, सोशल मीडियावर नालेसफाई पूर्ण झाल्याचे दावे करून प्रशासनाने केवळ कागदी घोडे नाचवल्याचा आरोप आंदोलकांनी केला. प्रत्यक्ष परिस्थिती मात्र धक्कादायक असून अनेक भागांमध्ये नाले पूर्णपणे चोकअप अवस्थेत असल्याचे दिसून आले.

दिवा शहरातील नालेसफाईसाठी तब्बल दीड कोटी रुपयांहून अधिक निधी मंजूर झाल्याची माहिती समोर आली आहे. मात्र कोट्यवधींचा निधी गेला कुठे? असा संतप्त सवाल आता नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. पावसाळ्यात पुन्हा एकदा दिवा शहर जलमय होण्याची शक्यता निर्माण झाली असून नागरिकांच्या जीविताशी सुरू असलेला हा खेळ थांबवण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

या आंदोलनात उपशहर प्रमुख मारुती पडळकर, विभाग प्रमुख योगेश निकम, उपविभाग प्रमुख अजित माने, अशोक आमोंडकर, संजय निकम, शाखाप्रमुख धनाजी पोवार, कृष्णा जाधव, मंगेश सोलकर, दौलतराव देसाई, समाजसेवक सुनील सूर्यवंशी, मोहन मटकर, सचिन वने यांच्यासह अनेक शिवसैनिक सहभागी झाले होते.

विशेष म्हणजे, ‘दिव्यांग आधार सामाजिक संस्था’चे संस्थापक अध्यक्ष धनाजी शंकर पोवार यांनी स्वतः दिव्यांग असूनही नाल्यात उतरून प्रशासनाला आरसा दाखवला. “दिव्यांग असून आम्ही नाल्यात उतरतो, पण पालिका प्रशासन मात्र खुर्चीत बसून झोपले आहे. प्रशासनच आता दिव्यांग झाले आहे का?” असा घणाघाती सवाल त्यांनी उपस्थित केला.

दरम्यान, नालेसफाईची कामे तात्काळ पूर्ण न झाल्यास तीव्र जनआंदोलन छेडण्याचा इशारा शिवसेना पदाधिकाऱ्यांनी दिला आहे. तसेच संबंधित अधिकारी आणि कंत्राटदारांची चौकशी करून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणीही करण्यात आली आहे.

#दिवा
#ठाणे
#नालेसफाई
#मान्सून2026
#ठाणेमहापालिका
#दिवानालेसफाई
#शिवसेना
#उद्धवठाकरे
#शिवसैनिक
#दिवाबातमी
#ठाणेन्यूज
#महाराष्ट्रनामा
#भ्रष्टाचार
#पालिका_प्रशासन
#मान्सूनपूर्वकामे
#दिवाकर
#जनआंदोलन
#BreakingNews
#MaharashtraNews
#DivaCity

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

लग्नाच्या आग्रहातून प्रेयसीची निर्घृण हत्या; पुरावे नष्ट करण्यासाठी मृतदेह जाळल्याचा आरोप

लग्नाच्या आग्रहातून प्रेयसीची निर्घृण हत्या; पुरावे नष्ट करण्यासाठी मृतदेह जाळल्याचा आरोप पनवेल | प्रतिनिधी लग्नासाठी सातत्याने होत असलेल्या आग्रहाला कंटाळून प्रेयसीची हत्या करून तिचा मृतदेह जंगलात...

भारतीय न्यायव्यवस्थेत महिला नेतृत्वाचा ऐतिहासिक टप्पा; एकाच वेळी चार महिला उच्च न्यायालयांच्या मुख्य न्यायमूर्ती

भारतीय न्यायव्यवस्थेत महिला नेतृत्वाचा ऐतिहासिक टप्पा; एकाच वेळी चार महिला उच्च न्यायालयांच्या मुख्य न्यायमूर्ती नवी दिल्ली प्रतिनिधी : भारतीय न्यायव्यवस्थेच्या इतिहासात प्रथमच एकाच वेळी चार...

मध्यरात्री पाठलाग करत घरी आला, मागून फ्रॅाकमध्ये हात घातला अन्.. वसईत धक्कादायक प्रकार

मध्यरात्री पाठलाग करत घरी आला, मागून फ्रॅाकमध्ये हात घातला अन्.. वसईत धक्कादायक प्रकार वसईमधून एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. एक महिला कामावरुन घरी जात...

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माजी आमदार सुभाष भोईर यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट विकासकामांबाबत सकारात्मक...

डोंबिवली / प्रतिनिधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे श्री पिंपळेश्वर महादेव भक्त मंडळ, डोंबिवली आयोजित कृतज्ञता सोहळा व जाहीर सत्कार कार्यक्रमासाठी डोंबिवली येथे आले असता त्यांनी...

दिव्यात शिवसेना ठाकरे गटाचे ‘गटर पूजन’ आंदोलन नालेसफाईच्या रखडलेल्या कामांवरून महापालिका प्रशासनाविरोधात संताप

दिव्यात शिवसेना ठाकरे गटाचे ‘गटर पूजन’ आंदोलन नालेसफाईच्या रखडलेल्या कामांवरून महापालिका प्रशासनाविरोधात संताप ठाणे | प्रतिनिधी पावसाळा तोंडावर आला असतानाही दिवा शहरातील नालेसफाईची कामे अद्याप अपूर्ण...

error: Content is protected !!