Homeताज्या बातम्याकोपरखैरणेमध्ये खासगी शिकवणीवर पहिल्या मजल्याचा स्लॅब कोसळला, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, अनेक जण...

कोपरखैरणेमध्ये खासगी शिकवणीवर पहिल्या मजल्याचा स्लॅब कोसळला, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, अनेक जण जखमी

ब्रेकिंग न्यूज
: शिमगोत्सवासाठी मुंबईहून कोकणात निघाले, पहाटे खासगी बसला भीषण अपघात; 28 प्रवाशांसह बस उलटलीकोपरखैरणेमध्ये खासगी शिकवणीवर पहिल्या मजल्याचा स्लॅब कोसळला, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, अनेक जण जखमीदिव्यातील नागरिकांच्या जीवाशी कोण खेळत आहॆ साबेगाव येथे सीलबंद पाण्याच्या बाटलीत आढळला साप; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण. प्रशासनाचा कानाडोळा🚨 खाकीचा काळा चेहरा उघडा! ‘एक लाख’ घेताना जाळ्यात, केबिनमध्ये 6.34 लाखांचा साठादापोलीत ग्राम महसूल अधिकाऱ्याला लाच घेताना रंगेहात अटक;समाजसेवेचा वसा चालू ठेवत माऊली फर्निचर जालगावकडून विद्यालयाला HP कलर प्रिंटर भेटदिवा स्थानकात कामगाराचा मृत्यूएपस्टीन फाईल्स’वरून वंचितचा केंद्र सरकारवर निशाणा; वंचित बहुजन आघाडीसोबत सामाजिक संघटनांची उद्या बैठक58 वर्षीय पोलीस उपनिरीक्षकाचा 23 वर्षीय तरुणीवर लॉजमध्ये अत्याचार, पुणे-छ. संभाजीनगरात तीन वेळा गर्भपातरत्नागिरी मध्ये गांजा सदृश अंमली पदार्थासह एकास अटक; ५६२.५ ग्रॅम मुद्देमाल जप्त

Navi Mumbai Slab Collapse : कोपरखैरणेमध्ये खासगी शिकवणीवर पहिल्या मजल्याचा स्लॅब कोसळला, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, अनेक जण जखमी

नवी मुंबईच्या कोपरखैरणे येथे एका घरगुती शिकवणी वर्गात अचानक पहिल्या मजल्यावरचा स्लॅब कोसळला. यामुळे मोठी दुर्घटना घडली. या घटनेत एका 14 वर्षीय विद्यार्थ्याचा मृत्यू झाला आहे.

नवी मुंबई : कोपरखैरणे येथे एका सोसायटीतील घरात सुरु असलेल्या खासगी शिकवणीत अचानक स्लॅब कोसळल्याची घटना घडली. विशेष म्हणजे घरगुती शिकवणी सुरु असतानाच स्लॅब कोसळल्याची घटना घडली. त्यामुळे 12 विद्यार्थी आणि 1 शिक्षिका स्लॅबच्या ढिगाऱ्याखाली अडकले होते. इमारतीच्या पहिल्या मजल्यावरचा स्लॅब थेट खाली कोसळल्याने ही दुर्दैवी घटना घडली. या घटनेत एका 14 वर्षीय विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. घटनेनंतर अग्निशामक दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले होते. अग्निशामक दलाच्या जवानांनी एका शिक्षिकेसह 13 जणांना ढिगाऱ्याखालून सुखरूप काढल्याची माहिती आहे.  संबंधित घटना ही कोपरखैरणे सेक्टर 2 येथील प्लॉट क्रमांक 12 वरील विद्या भवन सोसायटी येथे घडली. विद्या भवन सोसायटीच्या तळमजल्यावर घरगुती शिकवणी वर्ग सुरु होता. पण संध्याकाळी सव्वा पाच वाजेच्या सुमारास अचानक पहिल्या मजल्यावरील स्लॅबचा काही भाग हा थेट तळमजल्यावर असणाऱ्या शिकवणी वर्गावर पडला. त्यामुळे मोठी खळबळ उडाली. घटना घडली तेव्हा मोठा आवाज आला. त्यामुळे आजूबाजूचे नागरीक घटनास्थळी आले. यानंतर तातडीने बचावकार्याला सुरुवात झाली.

अग्निशामक दलाच्या जवानांकडून बचावकार्य

स्थानिक नागरिकांनी पोलीस आणि अग्निशामक दलाला याबाबत माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. अग्निशामक दलाच्या जवानांकडून तातडीने बचावकार्याला सुरुवात झाली. मलब्याखाली सर्व विद्यार्थी आणि शिक्षक दाबले गेले होते. जवानांनी त्यांचा शोध घेतला आणि त्यांना सुखरुप बाहेर काढले.जवानांकडून काही वेळ हे बचावकार्य चालले. या बचावकार्यात 12 विद्यार्थी आणि एका शिक्षिकेला सुरक्षितपणे ढिगाऱ्याखालून काढण्यात आले. या घटनेत अनेक विद्यार्थी जखमी देखील झाले आहेत. सर्व जखमी विद्यार्थ्यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण एका विद्यार्थ्याचा दुर्दैवाने उपचारादरम्यान मृत्यू झाला. मनीष म्हसे असं मृतक विद्यार्थ्याचं नाव आहे. मनीष हा अवघ्या 14 वर्षांचा होता. त्याच्या मृत्यूनंतर परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

संबंधित घटना जिथे घडली ती इमारत ही 1988 साली बांधण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. या सोसायटीत एकूण 16 कुटुंब वास्तव्यात आहेत. घटनेनंतर सर्व कुटुंबांना सुरक्षितस्थळी हलवण्यात आल्याची माहिती आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

: शिमगोत्सवासाठी मुंबईहून कोकणात निघाले, पहाटे खासगी बसला भीषण अपघात; 28 प्रवाशांसह बस उलटली

 शिमगोत्सवासाठी मुंबईहून कोकणात निघाले, पहाटे खासगी बसला भीषण अपघात; 28 प्रवाशांसह बस उलटली. रत्नागिरी : कोकणात सध्या शिमगोत्सवासाठी मुंबईहून अनेक चाकरमानी कोकणात दाखल होत आहेत...

दिव्यातील नागरिकांच्या जीवाशी कोण खेळत आहॆ साबेगाव येथे सीलबंद पाण्याच्या बाटलीत आढळला साप; नागरिकांमध्ये...

दिव्यातील नागरिकांच्या जीवाशी कोण खेळत आहॆ साबेगाव येथे सीलबंद पाण्याच्या बाटलीत आढळला साप; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण. प्रशासनाचा कानाडोळा. ठाणे दिवा : पिण्यासाठी विकत आणलेल्या २०...

🚨 खाकीचा काळा चेहरा उघडा! ‘एक लाख’ घेताना जाळ्यात, केबिनमध्ये 6.34 लाखांचा साठा

🚨 खाकीचा काळा चेहरा उघडा! ‘एक लाख’ घेताना जाळ्यात, केबिनमध्ये 6.34 लाखांचा साठा मुंबई | विशेष प्रतिनिधी मुंबईतील कुरार पोलीस ठाणे येथे खाकी वर्दीला काळीमा फासणारी धक्कादायक...

दापोलीत ग्राम महसूल अधिकाऱ्याला लाच घेताना रंगेहात अटक;

दापोलीत ग्राम महसूल अधिकाऱ्याला लाच घेताना रंगेहात अटक; लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई दापोली, ता. २५ : सातबारा उताऱ्यावर खरेदीखताची नोंद करून फेरफार करण्यासाठी दहा हजार रुपयांची...

समाजसेवेचा वसा चालू ठेवत माऊली फर्निचर जालगावकडून विद्यालयाला HP कलर प्रिंटर भेट

*माऊली फर्निचर जालगावकडून विद्यालयाला HP कलर प्रिंटर भेट* शिक्षणाच्या उन्नतीसाठी आणि विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक सोयीसाठी श्री. नंदू शिगवण (मालक – माऊली फर्निचर जालगाव) यांनी कै. कमलाकर...

error: Content is protected !!