Homeताज्या बातम्याएपस्टीन फाईल्स'वरून वंचितचा केंद्र सरकारवर निशाणा; वंचित बहुजन आघाडीसोबत सामाजिक संघटनांची उद्या...

एपस्टीन फाईल्स’वरून वंचितचा केंद्र सरकारवर निशाणा; वंचित बहुजन आघाडीसोबत सामाजिक संघटनांची उद्या बैठक

एपस्टीन फाईल्स’वरून वंचितचा केंद्र सरकारवर निशाणा; वंचित बहुजन आघाडीसोबत सामाजिक संघटनांची उद्या बैठक

मुंबई : जगभरात खळबळ उडवून देणाऱ्या ‘एपस्टीन फाईल्स’ प्रकरणात आता भारताच्या राजकारणातही तीव्र पडसाद उमटताना दिसत आहेत. या प्रकरणात थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नाव समोर आल्याने वंचित बहुजन आघाडीने (VBA) केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. या गंभीर प्रकरणावर भूमिका घेण्यासाठी आणि पुढील आंदोलनाची दिशा ठरवण्यासाठी उद्या, २० फेब्रुवारी रोजी मुंबईत वेगवेगळ्या सामाजिक संघटनांनी एका विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. या बैठकीत वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर हे मार्गदर्शन करणार आहेत.

वंचित बहुजन आघाडीचे मुख्य प्रवक्ते सिद्धार्थ मोकळे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, एपस्टीन फाईलसारख्या गलिच्छ प्रकरणात देशाच्या पंतप्रधानांचे नाव येणे ही देशासाठी शरमेने मान खाली घालायला लावणारी बाब आहे. मात्र, सभागृहातील प्रमुख विरोधी पक्ष या विषयाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहेत. अनेक संघटनांनी विरोधी पक्षांकडे आवाज उठवण्यासाठी विनंती केली, परंतु तिथून नकारात्मक प्रतिसाद मिळाला.

बाळासाहेब आंबेडकरांकडे नेतृत्वाची धुरा :

प्रमुख विरोधी पक्षांच्या उदासीनतेमुळे अनेक सामाजिक संघटनांनी वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांची भेट घेतली असून, या लढ्याचे नेतृत्व करण्याची विनंती त्यांना केली आहे. देशाची प्रतिमा आणि नैतिकतेचा प्रश्न असल्याने याविरोधात व्यापक जनआंदोलन उभारण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

या प्रकरणातील पुढील रणनीती ठरवण्यासाठी दिनांक २० फेब्रुवारी रोजी संध्याकाळी ६ वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन, दादर येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी ॲड. बाळासाहेब आंबेडकर आणि विविध सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. या बैठकीत आंदोलनाची पुढील दिशा आणि केंद्र सरकारला घेण्याची रणनीती स्पष्ट केली जाणार आहे.

#EpsteinFiles
#EpsteinCase
#IndianPolitics
#VBA
#VanchitBahujanAghadi
#PrakashAmbedkar
#BalasahebAmbedkar
#PMModi
#PoliticalControversy
#MumbaiMeeting
#OppositionPolitics
#SocialOrganizations
#BreakingNews
#IndiaNews
#PoliticalDebate

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

: शिमगोत्सवासाठी मुंबईहून कोकणात निघाले, पहाटे खासगी बसला भीषण अपघात; 28 प्रवाशांसह बस उलटली

 शिमगोत्सवासाठी मुंबईहून कोकणात निघाले, पहाटे खासगी बसला भीषण अपघात; 28 प्रवाशांसह बस उलटली. रत्नागिरी : कोकणात सध्या शिमगोत्सवासाठी मुंबईहून अनेक चाकरमानी कोकणात दाखल होत आहेत...

कोपरखैरणेमध्ये खासगी शिकवणीवर पहिल्या मजल्याचा स्लॅब कोसळला, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, अनेक जण जखमी

Navi Mumbai Slab Collapse : कोपरखैरणेमध्ये खासगी शिकवणीवर पहिल्या मजल्याचा स्लॅब कोसळला, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, अनेक जण जखमी नवी मुंबईच्या कोपरखैरणे येथे एका घरगुती शिकवणी...

दिव्यातील नागरिकांच्या जीवाशी कोण खेळत आहॆ साबेगाव येथे सीलबंद पाण्याच्या बाटलीत आढळला साप; नागरिकांमध्ये...

दिव्यातील नागरिकांच्या जीवाशी कोण खेळत आहॆ साबेगाव येथे सीलबंद पाण्याच्या बाटलीत आढळला साप; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण. प्रशासनाचा कानाडोळा. ठाणे दिवा : पिण्यासाठी विकत आणलेल्या २०...

🚨 खाकीचा काळा चेहरा उघडा! ‘एक लाख’ घेताना जाळ्यात, केबिनमध्ये 6.34 लाखांचा साठा

🚨 खाकीचा काळा चेहरा उघडा! ‘एक लाख’ घेताना जाळ्यात, केबिनमध्ये 6.34 लाखांचा साठा मुंबई | विशेष प्रतिनिधी मुंबईतील कुरार पोलीस ठाणे येथे खाकी वर्दीला काळीमा फासणारी धक्कादायक...

दापोलीत ग्राम महसूल अधिकाऱ्याला लाच घेताना रंगेहात अटक;

दापोलीत ग्राम महसूल अधिकाऱ्याला लाच घेताना रंगेहात अटक; लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई दापोली, ता. २५ : सातबारा उताऱ्यावर खरेदीखताची नोंद करून फेरफार करण्यासाठी दहा हजार रुपयांची...

error: Content is protected !!