Homeआरोग्यठाण्यात बनावट डॉक्टरांविरोधात महापालिकेची मोठी कारवाई

ठाण्यात बनावट डॉक्टरांविरोधात महापालिकेची मोठी कारवाई

घोडबंदर, दिवा, मुंब्रा परिसरात २४ संशयित बोगस डॉक्टरांचा पर्दाफाश

ठाणे | प्रतिनिधी

ठाणे महानगरपालिकेने शहरातील बोगस डॉक्टरांविरोधात सुरू केलेल्या विशेष मोहिमेत मोठी कारवाई करत तब्बल २४ संशयित बनावट डॉक्टरांचा शोध लावला आहे. या कारवाईमुळे शहरातील आरोग्य व्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून नागरिकांच्या जीवाशी खेळ करणारे अनेक जण वैद्यकीय व्यवसाय करत असल्याचे समोर आले आहे.

महापालिकेच्या आरोग्य विभागाने विविध विभाग समिती हद्दीत राबविलेल्या तपासणीत माजिवडा-मानपाडा विभागात सर्वाधिक ६ संशयित बोगस डॉक्टर आढळून आले. तसेच दिवा आणि कळवा विभागात प्रत्येकी ५ जण संशयाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. घोडबंदर आणि मुंब्रा परिसरातही अशा प्रकारचे बेकायदेशीर दवाखाने सुरू असल्याची माहिती समोर आली आहे.

मार्च महिन्यात झालेल्या ठाणे महानगरपालिकेच्या महासभेत बोगस डॉक्टरांचा मुद्दा जोरदारपणे उपस्थित करण्यात आल्यानंतर प्रशासनाने तातडीने विशेष पथक स्थापन केले होते. त्यानंतर शहरातील विविध क्लिनिक, दवाखाने आणि उपचार केंद्रांची सखोल तपासणी करण्यात आली. या तपासणीत अनेक जणांकडे वैद्यकीय पदवी किंवा अधिकृत नोंदणी नसतानाही रुग्णांवर उपचार सुरू असल्याचे धक्कादायक वास्तव उघड झाले.

महापालिकेच्या माहितीनुसार, शहरातील सुमारे १,४५२ दवाखान्यांची तपासणी करण्यात आली असून संशयित डॉक्टरांची नावे, पत्ते आणि संबंधित कागदपत्रांची माहिती संकलित करण्यात आली आहे. संबंधित प्रकरणांची चौकशी सुरू असून दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

आरोग्य विभागाने नागरिकांना आवाहन केले आहे की, कोणत्याही डॉक्टरांकडून उपचार घेण्यापूर्वी त्यांची शैक्षणिक पात्रता, वैद्यकीय नोंदणी क्रमांक आणि अधिकृत कागदपत्रांची खातरजमा करावी. नागरिकांच्या आरोग्याशी कोणालाही खेळू दिले जाणार नाही, असा इशाराही महापालिकेकडून देण्यात आला आहे.

#Thane #BogusDoctors #TMC #HealthAlert #Mumbra #Diva #Ghodbunder

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

लग्नाच्या आग्रहातून प्रेयसीची निर्घृण हत्या; पुरावे नष्ट करण्यासाठी मृतदेह जाळल्याचा आरोप

लग्नाच्या आग्रहातून प्रेयसीची निर्घृण हत्या; पुरावे नष्ट करण्यासाठी मृतदेह जाळल्याचा आरोप पनवेल | प्रतिनिधी लग्नासाठी सातत्याने होत असलेल्या आग्रहाला कंटाळून प्रेयसीची हत्या करून तिचा मृतदेह जंगलात...

भारतीय न्यायव्यवस्थेत महिला नेतृत्वाचा ऐतिहासिक टप्पा; एकाच वेळी चार महिला उच्च न्यायालयांच्या मुख्य न्यायमूर्ती

भारतीय न्यायव्यवस्थेत महिला नेतृत्वाचा ऐतिहासिक टप्पा; एकाच वेळी चार महिला उच्च न्यायालयांच्या मुख्य न्यायमूर्ती नवी दिल्ली प्रतिनिधी : भारतीय न्यायव्यवस्थेच्या इतिहासात प्रथमच एकाच वेळी चार...

मध्यरात्री पाठलाग करत घरी आला, मागून फ्रॅाकमध्ये हात घातला अन्.. वसईत धक्कादायक प्रकार

मध्यरात्री पाठलाग करत घरी आला, मागून फ्रॅाकमध्ये हात घातला अन्.. वसईत धक्कादायक प्रकार वसईमधून एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. एक महिला कामावरुन घरी जात...

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माजी आमदार सुभाष भोईर यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट विकासकामांबाबत सकारात्मक...

डोंबिवली / प्रतिनिधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे श्री पिंपळेश्वर महादेव भक्त मंडळ, डोंबिवली आयोजित कृतज्ञता सोहळा व जाहीर सत्कार कार्यक्रमासाठी डोंबिवली येथे आले असता त्यांनी...

दिव्यात शिवसेना ठाकरे गटाचे ‘गटर पूजन’ आंदोलन नालेसफाईच्या रखडलेल्या कामांवरून महापालिका प्रशासनाविरोधात संताप

दिव्यात शिवसेना ठाकरे गटाचे ‘गटर पूजन’ आंदोलन नालेसफाईच्या रखडलेल्या कामांवरून महापालिका प्रशासनाविरोधात संताप ठाणे | प्रतिनिधी पावसाळा तोंडावर आला असतानाही दिवा शहरातील नालेसफाईची कामे अद्याप अपूर्ण...

error: Content is protected !!