Homeताज्या बातम्याठाणे महानगरपालिका सभागृहात दिवा शहराचा आवाज बुलंद होतोय...*

ठाणे महानगरपालिका सभागृहात दिवा शहराचा आवाज बुलंद होतोय…*

ब्रेकिंग न्यूज
जिल्हा परिषद आदर्श केंद्र शाळा उंबर्ले ता दापोली च्या विद्यार्थीनी कु. पौर्णिमा अंजली प्रफुल्ल जाधव कु. दुर्वा आशिष जावळे यांची राज्यस्तरीय रग्बी स्पर्धेसाठी खेलो इंडिया साठी निवड*ठाणे जिल्ह्यात बाटली किंवा कॅनमध्ये पेट्रोल-डिझेल विक्रीवर बंदी*दिवा शहरात नागरिकांची गॅस सिलेंडर साठी उघड लूट; मनसेचे जिल्हाधिकाऱ्यांना पत्रठाणे महानगरपालिका सभागृहात दिवा शहराचा आवाज बुलंद होतोय…*भाजप च्या ऑफिस ला शासकीय जागा का दीपक केदार यांचा संतप्त सवाल*मुंब्रादेवी परिसरातील ‘नीरज मोबाईल शॉप’मध्ये गुटख्याचा मोठा साठा; पोलिसांच्या ‘सुस्त’ भूमिकेमुळे संशयाला बळ*ठाणे महापालिकेचा अर्थसंकल्प आयुक्त सौरभ राव यांनी महासभेत केला सादरदिवा शहरातील अनधिकृत बांधकामांवर तात्काळ कारवाईची मागणीविद्यार्थीनीचा लैंगिक छळ, कोकण कृषी विद्यापीठातील धक्कादायक प्रकार*एलपीजी गॅस टंचाईची भीती बाळगू नका; ठाणे जिल्हा प्रशासनाकडून मदत क्रमांक जाहीर*

ठाणे महानगरपालिका सभागृहात दिवा शहराचा आवाज बुलंद होतोय…*

*नगरसेवक अँड.आदेश भगत यांनी दिवा शहराकडे दुर्लक्ष करणाऱ्या प्रशासनाला सुनावले खडे बोल*

काल पार पडलेल्या अर्थसंकल्पीय विशेष सर्वसाधारण सभेत दिवा शहराविषयी भरीव तरतूद न केल्यामुळे नगरसेवक अँड आदेश भगत यांनी ठाणे महानगर पालिका प्रशासनाला चांगलेच धारेवर धरल्याचे चित्र बघायला मिळाले.
ठाणे महानगर पालिकेच्या स्थापनेपासून दिवा विभाग हा महापालिकेत समाविष्ट आहे, तरी सुद्धा दिवा शहराकडे सातत्याने दुर्लक्ष केले जात आहे. दिवेकरांचे भाग्य असे की, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब व खासदार डॉ.श्रीकांत शिंदे साहेब यांचे दिवा शहरावर प्रेम आहे. सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेब महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना व आता उपमुख्यमंत्री असताना नगरविकास खात्याकडून भरघोस निधी दिवा शहरासाठी आला. खासदार श्रीकांत शिंदे साहेबांनी आणलेल्या विशेष निधीतून अनेक रस्त्यांचे काँक्रीटीकरण झाले आहे. शिवसेना शहरप्रमुख, नगरसेवक, माजी उपमहापौर रमाकांत मढवी यांच्या पाठपुराव्यामुळे ही सर्व शक्य झाल्याचे नगरसेवक अँड आदेश भगत यांनी सभागृहाला सांगितले. ठाणे महानगर पालिकेच्या भरवशावर दिवा शहर राहिला असता तर शहराची पुरती वाताहत झाली असती असे म्हणत नगरसेवक अँड.आदेश भगत यांनी संपूर्ण अर्थसंकल्पात दिवा शहराचा उल्लेख अभावानेच झाला असल्याचे सभागृहाच्या निदर्शनात आणून दिले.
*सन २०२६-२७ च्या अर्थसंकल्पात अनेक आधुनिक प्रकल्प दिसत आहेत पण, या सर्व प्रकल्पांमध्ये ‘दिवा शहर’ कुठेच दिसत नसल्याची खंत अँड आदेश भगत यांनी व्यक्त केली.* पोलिस स्टेशन, रुग्णालय, रेशनिंग कार्यालय, तलाठी कार्यालय, अग्निशामक केंद्र , पोस्ट ऑफिस सारखे सर्व महत्वाच्या गोष्टी दिवा शहराच्या बाहेर आहेत. खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांच्या प्रयत्नाने रुग्णालय आणि पोलिस स्टेशन चा प्रश्न मार्गी लागला असला तरी ठाणे महानगर पालिकेला यांच्या उभारणीसाठी जागा मिळू नये, ही शोकांतिका असल्याचे मत नगरसेवक अँड आदेश भगत यांनी व्यक्त केले.
२०२६-२७ च्या अर्थसंकल्पात प्रस्तावित कामांमध्ये खालील मागण्यांचा विचार करून तशी तरतूद अर्थसंकल्पात करावी अशी मागणी नगरसेवक अँड आदेश भगत यांनी केली आहे.
*१) रेतीबंदर ते दिवा गाव कोस्टल रस्ता तयार करा.*
२०२६-२७ च्या अर्थसंकल्पात ठाणे कोस्टल रोड प्रस्तावित आहे. हा रस्ता खारिगाव- बालकुम ते भाईंदर पाडा पर्यंत असून त्याच धर्तीवर रेतीबंदर ते दिवा गाव हा रस्ता तयार करावा. १२ डिसेंबर २०२२ रोजी ठाणे महानगर पालिकेच्या नगर अभियंत्यांनी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण ला या रस्त्यासंदर्भात लेखी पत्राद्वारे सुचवले आहे. रेतीबंदर ते दिवा गाव ह्या रस्त्यासंदर्भात धोरणात्मक निर्णय घेऊन हा रस्ता पुढे बुलेट स्टेशन, म्हातार्डी पर्यंत वाढवावा अशी सूचना यावेळी नगरसेवक अँड आदेश भगत यांनी केली.

*२) दिवा स्टेशन तलावाचे संवर्धन आणि सुशोभीकरण करावे*
२०२६-२७ च्या अर्थसंकल्पात एकात्मिक तलाव संवर्धन व सुशोभीकरण अंतर्गत अमृत २.०० योजनेतील water bodies rejuvenation अंतर्गत ठाणे महानगर पालिका क्षेत्रातील १५ तलावांचा विकास करण्यात येत आहे. प्रभाग क्रमांक २७ मध्ये स्टेशन जवळ असलेल्या तलावाची अवस्था फार बिकट झाली असल्याचे नगरसेवक अँड आदेश भगत यांनी सांगितले. सदर तलावाचे संवर्धन आणि सुशोभीकरण करून तलावाभोवती पदपथ आणि जॉगिंग ट्रॅक उभारावा अशी सूचना अँड आदेश भगत यांनी केली.

*३) दिवा पश्चिमेतील ठाणे महानगर पालिकेची शाळा १० वी पर्यंत करावी.*
२०२६-२७ च्या अर्थसंकल्पात ठाणे महानगर पालिका क्षेत्रातील ६२ शाळा ह्या आदर्श शाळा (मॉडेल स्कूल) करण्याचा प्रस्ताव आहे. ह्या ६२ शाळांमध्ये दिवा पश्चिमेतील शाळा क्रमांक ९८ व ७९ या शाळेचा देखील समावेश करावा अशी मागणी नगरसेवक अँड आदेश भगत यांनी केली.
याशिवाय सदर शाळा दहावी पर्यंत करावी ही २०११ पासून ची मागणी असून ती मागणी पूर्ण करावी व दिवा शहरात CBSC बोर्डाच्या शाळा सुरू कराव्यात अशी सूचना ह्या वेळी अँड आदेश भगत यांनी केली.

*४) दिवा आगसन व दिवा शीळ रस्त्याच्या दुतर्फा वृक्ष लागवड करावी*
सन २०२६-२७ च्या अर्थसंकल्पात ठाणे महानगर पालिका हद्दीतील विविध डी.पी. रस्त्यांच्या दुतर्फा वृक्ष लागवड करण्याचे प्रस्तावित आहे. या करिता २०२६-२७ च्या अर्थसंकल्पात सुमारे २ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. या प्रस्तावित कामामध्ये दिवा शहरातील दिवा-आगसन व दिवा-शीळ रस्त्याच्या दुतर्फा वृक्ष लागवड करावी अशी सूचना नगरसेवक अँड आदेश भगत यांनी केली.

*५) दिवा पश्चिमेतील स्मशान भूमीची पुनर्बांधणी करावी*
दिवा शहराच्या पश्चिमेला असलेल्या स्मशान भूमीची परिस्थिती फार बिकट असून सदर स्मशान भूमीवर छत नाही व नागरिकांना बसण्याची व्यवस्था नसल्याने त्यांची प्रचंड गैरसोय होत आहे. सदर स्मशान भूमीची महसूल सदरी नोंद असून २०१३ मध्ये या स्मशान भूमीच्या बांधणीसाठी १४ लक्ष रुपयांचा निधी मंजूर झाला होता. परंतु या ठिकाणी कोणतेही काम करण्यात आले नाही. अखेर दिवा ग्रामस्थानी लोकवर्गणीतून सदर स्मशान भूमीत लोखंडी बर्नर, सिमेंट चौथरा, भराव केला आहे. २०२६-२७ च्या अर्थसंकल्पात सदर स्मशानभूमीच्या पुनर्बांधणीसाठी नियोजन करावी अशी मागणी नगरसेवक अँड आदेश भगत यांनी केली.

६) *दिवा शहरातील सर्व प्रमुख आणि अंतर्गत रस्त्यांची दररोज सफाई करावी*
२०२६-२७ च्या अर्थसंकल्पात सर्वकष स्वच्छता मोहीम (Deep Cleaning) अधिक व्यापकपणे राबवण्याचे प्रस्तावित केले आहे. दिवा शहरातील सर्व प्रमुख आणि अंतर्गत रस्त्यांची दररोज साफसफाई करण्यात यावी अशी मागणी नगरसेवक अँड आदेश भगत यांनी केली. दिवा शहरात प्रचंड स्वच्छता असल्यामुळे डीप क्लिनिंग नाही तर Keep Cleaning हे धोरण दिवा शहरासाठी राबवले पाहिजे असे नगरसेवक अँड आदेश भगत यांनी सुचवले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

जिल्हा परिषद आदर्श केंद्र शाळा उंबर्ले ता दापोली च्या विद्यार्थीनी कु. पौर्णिमा अंजली प्रफुल्ल...

जिल्हा परिषद आदर्श केंद्र शाळा उंबर्ले ता दापोली च्या विद्यार्थीनी कु. पौर्णिमा अंजली प्रफुल्ल जाधव कु. दुर्वा आशिष जावळे यांची राज्यस्तरीय रग्बी स्पर्धेसाठी खेलो इंडिया...

*ठाणे जिल्ह्यात बाटली किंवा कॅनमध्ये पेट्रोल-डिझेल विक्रीवर बंदी*

*ठाणे जिल्ह्यात बाटली किंवा कॅनमध्ये पेट्रोल-डिझेल विक्रीवर बंदी* *जिल्हाधिकाऱ्यांचे कडक आदेश* ठाणे,दि.27(जिमाका): समाजमाध्यमांवर पेट्रोल आणि डिझेलचा तुटवडा निर्माण होणार असल्याच्या अफवा आणि बातम्या पसरत असल्याच्या पार्श्वभूमीवर...

दिवा शहरात नागरिकांची गॅस सिलेंडर साठी उघड लूट; मनसेचे जिल्हाधिकाऱ्यांना पत्र

दिवा शहरात नागरिकांची गॅस सिलेंडर साठी उघड लूट; मनसेचे जिल्हाधिकाऱ्यांना पत्र दिवा शहरात घरगुती गॅस सिलेंडर वितरणामध्ये मोठा घोटाळा सुरू असल्याचे समोर आले आहे. नागरिकांनी...

भाजप च्या ऑफिस ला शासकीय जागा का दीपक केदार यांचा संतप्त सवाल

🔴मंत्रालयाच्या बाजूला महाराष्ट्र शासनाच्या जागेवर भारतीय जनता पार्टीला पंधरा हजार चौरस फूट जागा ऑफिस साठी देणारा जीआर रात्री जाहीर करण्यात आलेला आहे, हे धक्कादायक...

*मुंब्रादेवी परिसरातील ‘नीरज मोबाईल शॉप’मध्ये गुटख्याचा मोठा साठा; पोलिसांच्या ‘सुस्त’ भूमिकेमुळे संशयाला बळ*

*मुंब्रादेवी परिसरातील 'नीरज मोबाईल शॉप'मध्ये गुटख्याचा मोठा साठा; पोलिसांच्या 'सुस्त' भूमिकेमुळे संशयाला बळ* *अनेक तासांपूर्वीच कल्पना देऊनही गुटखा माफि्यांवर कारवाई नाही* ​दिवा (प्रतिनिधी): एकीकडे राज्य सरकार...

error: Content is protected !!