*मुंब्रादेवी परिसरातील ‘नीरज मोबाईल शॉप’मध्ये गुटख्याचा मोठा साठा; पोलिसांच्या ‘सुस्त’ भूमिकेमुळे संशयाला बळ*
*अनेक तासांपूर्वीच कल्पना देऊनही गुटखा माफि्यांवर कारवाई नाही*
दिवा (प्रतिनिधी): एकीकडे राज्य सरकार आणि पोलीस प्रशासन अमली पदार्थ तसेच प्रतिबंधित गुटख्याविरोधात कडक पावले उचलत असल्याचा दावा करत असताना, मुंब्रादेवी हॉस्पिटल समोरील ‘अपना शिवम मार्ट’ खाली असलेल्या ‘नीरज मोबाईल शॉप’ मध्ये गुटख्याचा काळाबाजार सुरू असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. विशेष म्हणजे, तक्रार करूनही पोलिसांनी रात्रभर कोणतीही कारवाई न केल्याने आता प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी रात्री उशिरा मुंब्रादेवी हॉस्पिटल समोरील नीरज मोबाईल शॉपवर एका खासगी वाहनातून मोठ्या प्रमाणात प्रतिबंधित गुटख्याचा साठा उतरवण्यात येत होता. या बेकायदेशीर हालचालींची माहिती मिळताच ‘महाराष्ट्र नामा’चे संपादक संदीप जाधव यांनी घटनास्थळी धाव घेत स्वतः या माहितीची पुष्टी केली.
संदीप जाधव यांनी या प्रकाराबाबत तात्काळ दिवा पोलीस चौकीला माहिती दिली. गुटख्याचा साठा जप्त होईल आणि संबंधित दोषींवर कारवाई होईल, या अपेक्षेने पत्रकार रात्रभर त्या ठिकाणी पाळत ठेवून थांबले होते. मात्र, रात्र उलटली तरी पोलिसांनी घटनास्थळी फिरकण्याची तसदी घेतली नाही.
अखेर पहाटे पावणे ५ च्या सुमारास गुटखा माफिया ऑटो रिक्षा घेऊन त्या ठिकाणी पोहोचला आणि त्याने दुकानाचा शटर खोलून पटापट सर्व गुटख्याचे पोते त्या ठिकाणाहून रिक्षात भरून पालायन केले. उपस्थित पत्रकाराने त्यावेळेस त्याला रोखण्याचा प्रयत्न केला असता आरोपीने स्वतःच आपल्या ऑटो रिक्षाच्या काचेवर दगड मारून टाच फोडली व आरडाओरड करू लागला तरी गुटखा माफिया तिथून पलायन करत असताना पत्रकाराने एक गुटक्याचे बाजके ओढून खाली घेतले व ते जमा करण्याकरता दिवा पोलीस चौकी येते पहाटे सुमारे पाच वाजता पोहोचले परंतु दिवा पोलीस चौकीचे शटर बंद असल्याने गुटखा माफियांचा आणि पोलीस प्रशासनाच्या संगणमताचे संशय अधिक बळावले.
”आम्ही पुराव्यासह माहिती देऊनही पोलीस प्रशासन कारवाईसाठी पुढे का आले नाही? हा साठा कोणाच्या आशीर्वादाने उतरवला जात होता?” गुटखा माफिया विरोधातील भूमिका घेतल्यानंतर हा सर्व घडलेला प्रकार म्हणजे जागरूक नागरिक व प्रामाणिक पत्रकारांना षडयंत्रात गोवण्याचा कट तर केला जात नाही ना ? असा संतप्त सवाल आता उपस्थित केला जात आहे.
संशयाची सुई प्रशासनाकडे
मोठ्या प्रमाणात गुटखा उतरवला जात असल्याची तक्रार करूनही पोलिसांनी कारवाईत दाखवलेली दिरंगाई ही संशयाला बळ देणारी ठरत आहे. मोबाईल शॉपच्या नावाखाली गुटख्याचा साठा करून तो परिसरात विकला जात असल्याची शक्यता वर्तवण्यात येत असून, यामध्ये मोठे रॅकेट सक्रिय असल्याचे बोलले जात आहे.
या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी तातडीने या दुकानावर छापा टाकावा आणि संबंधित वाहनचालक व दुकान मालकावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी आता जोर धरत आहे. अन्यथा, प्रशासनाच्या या भूमिकेविरोधात तीव्र आवाज उठवण्याचा इशारा स्थानिक पत्रकारांनी दिला आहे.

मुख्य संपादक: संदीप जाधव
























